टीव्ही 9 इम्पॅक्ट : एपीएमसी मार्केट कामगार, व्यापाऱ्यांची कोरोना टेस्ट घ्या, एकनाथ शिंदेंचे आदेश
मुंबई एपीएमसीतील भाजीपाला, कांदा-बटाटा आणि मसाला मार्केट शिस्तबद्धरित्या चालू करण्यास बाजार समितीला (APMC market workers corona test) यश आले आहे.
नवी मुंबई : मुंबई एपीएमसीतील भाजीपाला, कांदा-बटाटा आणि मसाला मार्केट शिस्तबद्धरित्या चालू करण्यास बाजार समितीला (APMC market workers corona test) यश आले आहे. आता बंद असलेल्या फळ आणि धान्य बाजार सुरू व्हावा म्हणून पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यापारी, माथाडी आणि बाजार समिती संचालक यांची बैठक घेऊन मार्केट सुरू करण्याच्या सूचना दिल्या. सर्व बाजारात सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले गेले पाहिजे. गर्दी होता कामा नये, शिस्तीत सर्व व्यवहार झाले पाहिजेत, यासोबत बाजारातील सर्व कामगार आणि व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी करावी, अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांना दिल्या आहेत. याबाबतचे वृत्त 14 एप्रिल रोजी टीव्ही 9 ने दिलं होते. या बातमीची दखल घेत एकनाथ शिंदेंनी कामगार आणि व्यापाऱ्यांची टेस्ट करण्याच्या सूचना (APMC market workers corona test) दिल्या.
एकनाथ शिंदे म्हणाले, “फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये जे कामगार आणि व्यापारी आहेत त्यांची स्क्रीनिंग टेस्ट करण्यात येईल. जर लक्षणे आढळून आली तर त्यांची सुद्धा कोरोना टेस्ट करण्यात येईल.”
याबैठकीला कोकण विभाग आयुक्त शिवजीराव दौंड, खासदार राजन विचारे, माथाडी नेते नरेंद्र पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, बाजार समिती सचिव अनिल चव्हाण, सर्व बाजारपेठेचे संचालक, व्यापारी आणि माथाडी कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.
आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई एपीएमसीच्या फळे आणि भाजीपाला मार्केटमध्ये दुसरी मोठी झोपडपट्टी पाहायला मिळाली आहे. यामध्ये राहणाऱ्या हजारो कामगारांना आणि व्यापाऱ्यांची कुठल्याही प्रकारची कोरोना चाचणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
धक्कादायक बाब अशी आहे की व्यापाऱ्यांनी भाजीपाला आणि फळ बाजारातील त्यांच्या कार्यालयात आणि गाळ्यांमध्ये परप्रांतीय कामगारांना आश्रय दिले आहेत. या कामगारांकडे माथाडी बोर्ड किंवा बाजार समितीचे कुठलेही ओळखपत्र नाही आणि ज्या व्यापाऱ्याकडे हे कामगार काम करतात त्यांच्याकडे त्यांची नोंदही नाही. बिन्धास्तपणे कामगार मार्केटमध्ये वास्तव्य करत असून मुक्तपणे फिरत आहेत. तसेच एकत्र बसून गप्पा मारत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे बाजार आवरात समुह संसर्ग होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे.
दरम्यान, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आतापर्यंत राज्यात 2916 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर देशात आतापर्यंत दहा हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत.
संबंधित बातम्या :
नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 51 वर, मुंबई एपीएमसीतील मार्केट ‘कोरोना हॉटस्पॉट’च्या वाटेवर?