आम्ही दिलगीर आहोत!
एन. डी. पाटील यांचं वय नव्वदीच्या पुढे आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली. पण त्यावर मात करुन एन. डी. पाटील कोरोनामुक्त झालेत

tv9 marathi
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या प्रकृतीबाबत चुकीची बातमी प्रसारित केल्याबद्दल tv9 मराठी डिजीटल दिलगिरी व्यक्त करत आहे. एन. डी. पाटील यांचं वय नव्वदीच्या पुढे आहे. तशातच त्यांना कोरोनाची लागण झाली. पण त्यावर मात करुन एन. डी. पाटील कोरोनामुक्त झालेत. आमच्यासह तमाम महाराष्ट्रासाठी ही आनंदाची बातमी आहे. ही बातमी देत असतानाच आमच्या प्रतिनिधीकडून घाईगडबडीत आणि कोरोना बातम्यांच्या तणावात चुकीची माहिती दिली गेली. त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करत आहोत आणि एन. डी. पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करत आहोत.