ऑक्सिजन सिलेंडर घेऊन कोरोना रुग्णाचा महापालिकेसमोर ठिय्या, बेड मिळत नसल्याने आंदोलनाची वेळ!

दोन कोरोनाग्रस्त रुग्णांनी नाशिक महापालिकेसमोरच ठिय्या दिला. अनेक रुग्णालय फिरुनही बेड मिळत नसल्याने या कोरोना रुग्णांनी महापालिकेसमोर ठिय्या दिला आहे.

ऑक्सिजन सिलेंडर घेऊन कोरोना रुग्णाचा महापालिकेसमोर ठिय्या, बेड मिळत नसल्याने आंदोलनाची वेळ!
नाशिक महापालिकेसमोर कोरोना रुग्णाचा ठिय्या
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 7:29 PM

नाशिक : राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊन धडकली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसारख्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. अशावेळी आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचं चित्र पुन्हा पुन्हा समोर येत आहे. नाशिकमध्ये आरोग्य व्यवस्थेचं असंच एक विदारक चित्र आज पाहायला मिळालं. दोन कोरोनाग्रस्त रुग्णांनी नाशिक महापालिकेसमोरच ठिय्या दिला. अनेक रुग्णालय फिरुनही बेड मिळत नसल्याने या कोरोना रुग्णांनी महापालिकेसमोर ठिय्या दिला आहे. त्यामुळे महापालिका परिसरात एकच खळबळ उडाली.(Two Corona patients protest in front of Nashik Municipal Corporation)

आरोग्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर

दोन कोरोना रुग्णांची नाशिक महापालिकेसमोरच ठिय्या आंदोलन केलं. ऑक्सिजन सिलेंडरसह हे दोन्ही रुग्ण महापालिकेसमोर आंदोलनाला बसले. अनेक रुग्णालयात फिरुनही बेड मिळत नसल्यानं या रुग्णांनी ठिय्या आंदोलन केलं. या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतोय. अशा स्थितीत या दोन्ही रुग्णांनी महापालिकेसमोरच ठिय्या दिला. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेकडून कोरोना रुग्णांसाठी होत असलेल्या तोकड्या उपाययोजना चव्हाट्यावर आल्या आहेत.

Corona patient Protest

नाशिक महापालिकेसमोर कोरोना रुग्णाचं ठिय्या आंदोलन

भाजी बाजारात नियमांचा फज्जा

दुसरीकडे काल संध्याकाळी पवन नगरच्या भाजी बाजारात नियमांचा फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. भाजी बाजारात जाण्यासाठई 5 रुपये शुल्क आकरण्यात येत होते. ही पावती घेण्यासाठीही नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पावती घेण्यासाठी नागरिकांनी भली मोठी रांग लावली होती. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजल्याचं दिसून आलं. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पलिकेनं भाजी बाजारात प्रवेशासाठी शुल्क आकारणीचा निर्णय घेतला होता. पण त्याचा उलटाच परिणाम पाहायला मिळाला.

देवळा तालुक्यात 10 दिवस जनता कर्फ्यू

नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात 1 एप्रिलपासून 10 दिवस जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. देवळा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्यानं सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आलाय. कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला गेलाय. जनता कर्फ्यू दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं आणि आस्थापना पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. किराणा दुकानंही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

संबंधित बातम्या :

रुग्णालयाचा प्रताप, कोरोना झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला दिली एक्स्पायर झालेली औषधे

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी छगन भुजबळ थेट रस्त्यावर, नियम मोडणाऱ्यांची झाडाझडती!

Two Corona patients protest in front of Nashik Municipal Corporation

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.