नागपुरात इंजेक्शनचा काळाबाजार, Tocilizumab ची किंमत एक लाख रुपये, 2 डॉक्टरसह एकाला बेड्या

नागपूर पोलिसांनी Tocilizumab इंजेक्शन अवैधरीत्या विकणाऱ्यांना अटक केली आहे. (Nagpur corona virus Tocilizumab injection)

नागपुरात इंजेक्शनचा काळाबाजार, Tocilizumab ची किंमत एक लाख रुपये, 2 डॉक्टरसह एकाला बेड्या
injuction and corona
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 9:06 PM

नागपूर : राज्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करत आहेत. रोज हजारो कोरोनाग्रस्त नव्याने आढळत आहेत. सध्या रुग्णसंख्या कमी होत आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, अजूनही रेमडेसिव्हीर तसेच Tocilizumab सारख्या इंजेक्शनचा काळाबाजार थांबलेला नाही. नागपूरमध्ये काळेबाजीरचा एक प्रकार उघडकीस आला आहे. नागपूर पोलिसांनी Tocilizumab इंजेक्शन अवैधरीत्या विकणाऱ्यांना अटक केली आहे. या कारवाईत एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. (Two doctors with One more man held for black marketing of Tocilizumab injection in Nagpur Corona virus)

एक इंजेक्शन 1 लाख रुपयांना विकण्याच्या तयारीत

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. अनेक कोविड सेंटर्समध्ये बेड्स रिकामे आहेत. असे असले तरी काही ठिकाणी औषधांचा तुटवडा जाणवतो आहे. रेमडेसिव्हीर तसेच Tocilizumab सारखे इंजेक्शन वेळेवर मिळत नाहीयेत. याचाच फायदा घेऊन नागपुरात Tocilizumab हे इंजेक्शन अवैधरीत्या विकण्याची तयारी एका टोळीकडून सुरु होती. मात्र, माहिती मिळताच पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. पोलिसांनी अवैधरीत्या इंजेक्शन विकणाऱ्या एकूण तीन आरोपींना अटक केले आहे. यातील दोन आरोपी हे बीएचएमएस डॉक्टर असल्याची माहिती आहे. काळ्याबाजारात इंजेक्शन विकणारी ही टोळी Tocilizumab इंजेक्शन तब्बल एक लाख रुपयांमध्ये विकणार होती. मात्र, हे इंजेक्शन विकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांचा पर्दाफाश केला.

तिन्ही आरोपी मध्य प्रदेशचे रहिवासी

सध्या पकडण्यात आलेल्या तीन जणांची टोळी Tocilizumab हे इंजेक्शन काळ्या बाजारात विकण्याच्या तयारीत होती. मात्र, गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेतले. हे तिन्ही आरोपी मध्य प्रदेशातील रहिवासी असून नागपुरात भाड्याने राहतात. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

नागपुरात 5 हजारच्यावर बेड उपलब्ध

सध्या नागपुरात बेड उपलब्ध व्हायला लागले आहेत. नागपुरात 7 हजार 754 बेड पैकी 5 हजारच्यावर बेड उपलब्ध आहेत. ऑक्सिजन आणि औषधांचा पुरवठासुद्धा आता उपलब्ध होत असल्याने नागपूरकरांना दिलासा मिळायला सुरवात झाली आहे. रुग्णालयावरील ताण कमी झालाय. मात्र, महापालिका कोरोनाच्या तिसरी लाटेची शक्यता बघता बालकांसाठी कोव्हिड रुग्णालयाची निर्मिती करणार असून आता प्रशासनाने तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याची तयारी सुरु केली आहे.

इतर बातम्या :

VIDEO : ‘दारू विकाल तर घरात घुसून मारू’, चंद्रपुरात नागरिकांचा संयमाचा बांध फुटला, अवैध दारूविक्रेत्याच्या घरावर हल्लाबोल

Nagpur Corona | नागपुरात कोरोनाचं दिलासादायक चित्र, 5 हजारच्यावर बेड उपलब्ध

रुग्णालयांमध्ये लहान मुलांसोबत पालकांचीही व्यवस्था हवी, नागपुरात फडणवीसांच्या प्रशासनाला सूचना

(Two doctors with One more man held for black marketing of Tocilizumab injection in Nagpur Corona virus)

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.