‘या’ गावची सरपंच पदाची लढत का ठरतेय चर्चेचा विषय…ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही…

गाव एकच आणि नावही एकच असल्यानं ग्रामपंचाय निवडणुकीतील थेट सरपंच पदाची निवडणूक चर्चेचा विषय ठरत असून पंचक्रोशीच नाही संपूर्ण राज्यभर या गावाची चर्चा होऊ लागली आहे.

'या' गावची सरपंच पदाची लढत का ठरतेय चर्चेचा विषय...ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Dec 17, 2022 | 8:53 AM

नाशिक : सध्या राज्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामध्ये काही गावांची विशेष चर्चा होत असते. राजकीय विरोधक आमने-सामने आल्यानं, अनेक ठिकाणी तृतीयपंथी निवडणुकीत नशीब आजमावत असल्यानं, तर काही ठिकाणी एकाच घरातील व्यक्ती एकमेकांच्या विरोधात दंड थोपटांना दिसून येतात त्यामुळं. पण नाशिकमधील एक गाव यापेक्षा वेगळं ठरल्यानं जोरदार चर्चा होऊ लागली आहे. नाशिकमधील सामानगाव येथील ग्रामपंचायत निवडणूक राज्यभर चर्चेत येऊ आली आहे. त्याचे कारण म्हणजे गाव एकच आणि दोन्ही उमेदवार महिलांचे नावही एकच. सामानगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ग्रामविकास पॅनल आणि परिवर्तन पॅनल असे दोन पॅनल निवडणूक रिंगणात आहे. त्यामध्ये दोन्ही पॅनल कडून सरपंच पदासाठी ज्या महिला उमेदवार देण्यात आले आहे. त्यांची नाव आणि आडनाव सारखीच आहे. त्यामुळे मतदारांचा गोंधळ उडण्याची मोठी शक्यता आहे.

कविता जगताप असं दोन्ही महिल्यांचे नाव आहे. त्यामुळे या निवडणुक रिंगणात एक कविता ग्रामविकास पॅनल कडून तर दुसरी कविता परिवर्तन पॅनल कडून नशीब आजमावत आहे.

सामानगाव ग्रामपंचायतीचं सरपंच पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण स्री असे होते, त्यामुळे महिला उमेदवार म्हणून ज्यांची उमेदवारी झाली त्या दोन्ही महिलांचे नावे योगायोगाने सारखीच आली आहे.

हे सुद्धा वाचा

नाशिकरोड येथील विशाल संगमनेरे आणि सचिन जगताप यांच्या नेतृत्वात असलेल्या ग्रामविकास पॅनल कडून कविता नंदकिशोर जगताप या थेट सरपंच पदाच्या उमेदवार आहे.

नाशिक पंचायत समितीचे माजी उपसभापती विजय जगताप यांच्या नेतृत्वात असलेल्या परिवर्तन पॅनलकडून थेट सरपंच पदाच्या उमेदवार कविता विजय जगताप या आहेत.

प्रचाराच्या तोफा थंडावल्या सध्या थंडावल्या असल्या तरी काही तासांवर मतदानाची प्रक्रिया आली आहे. त्यातच दोन नावांचे उमेदवार सारखेच आहे. चिन्ह आणि मधील नाव वेगवेगळे असले तरी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गाव एकच आणि नावही एकच असल्यानं ग्रामपंचाय निवडणुकीतील थेट सरपंच पदाची निवडणूक चर्चेचा विषय ठरत असून पंचक्रोशीच नाही संपूर्ण राज्यभर या गावाची चर्चा होऊ लागली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.