कोल्हापूर : चालकाचा ताबा सुटून इनोव्हा कार पडली दरीत; दोघा मित्रांचा जागीच मृत्यू, इतर दोघे गंभीर जखमी

भरधाव कार ही पुईखडी टेकडीवर आल्यानंतर शुभमचा गाडीवरचा ताबा सुटला आणि कार पुईखडी टेकडीवरून खाली पडली. यावेळी कार ही 25 फूट खोल दरीत कोसळून उलटली.

कोल्हापूर : चालकाचा ताबा सुटून इनोव्हा कार पडली दरीत; दोघा मित्रांचा जागीच मृत्यू, इतर दोघे गंभीर जखमी
अपघातImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 3:10 PM

कोल्हापूर : कोल्हापूर शहरानजीक (Kolhapur City) असणाऱ्या पुईखडी येथे चालकाचा ताबा सुटून इनोव्हा कार दरीत पडल्याची घटना घडली आहे. या झालेल्या अपघातात (Accident) दोघा मित्रांवर काळाने घाला घातला आहे. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. शुभम हेमंत सोनार (वय २४ रा. राजारामपूरी) आणि शंतनू शिरीष कुलकर्णी (वय २८ रा. मोरेवाडी, ता. करवीर) अशी ठार झालेल्या दोघांची नावे असून संकेत बाळकृष्ण कडणे (२१ रा. खाडीलकर गल्ली, गावभाव, सांगली), सौरभ रविंद्र कणसे (२६ रा. राजारामपूरी ६ वी गल्ली) अशी जखमी तरुणांची नावे आहेत. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. तर अपघातात गंभीर जखमी कडणे आणि कणसे यांच्यावर सीपीआर रुग्णालयात (CPR Hospital) उपचार सुरू आहेत. याबाबत करवीर पोलिसांत नोंद झाली असून पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली आहे.

गाडीवरचा ताबा सुटला आणि कार पुईखडीवरून खाली

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुभम सोनार, शंतनू कुलकर्णी, संकेत कडणे आणि सौरभ कणसे हे चौघे मित्र आपल्या इनोव्हा गाडीने ( एम एच 09-GA-36 37) वाशी येथील फार्म हाऊसवर जेवणासाठी गेले होते. रात्री जेवण आटोपून ते मध्यरात्री चौघेही घरी जात असताना हा अपघात झाला. त्यावेळी शुभम हा कार चालवत होता. भरधाव कार ही पुईखडी टेकडीवर आल्यानंतर शुभमचा गाडीवरचा ताबा सुटला आणि कार पुईखडी टेकडीवरून खाली पडली. यावेळी कार ही 25 फूट खोल दरीत कोसळून उलटली.

जागीच मृत्यू

कार दरीत इतक्या जोरात कोसळली की ज्यामुळे कारमधील शुभम सोनार आणि शंतनू कुलकर्णी यांचा जागीच मृत्यू झाला. तर तर सौरभ रवींद्र कणसे आणि संकेत बाळकृष्ण कडणे या अपघातात गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तर चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार दरीत कोसळल्याची माहिती करवीर पोलिसांनी दिली. तसेच या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री पंचनामा केला आहे. तर अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे करत आहेत.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, शुभम आणि शंतनू घरातील दोन तरूण मुलांचा अपघाती मृत्यू झाल्याने सुतार आणि कुलकर्णी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.