दोन मंत्र्यांनी आमदाराला घेरलं, पण घडलं भलतंच… आमदाराने दिला इशारा, मंत्र्यांना फुटला घाम

त्यांच्या सरकारविरोधी भावना बनल्या आहेत. आधी सरकार चांगलं होतं. आता तुमच्यावर कारवाई झाली तर सरकार चुकीचं झालं का? आधे इधर, आधे उधर आणि त्यातून कोट्यवधी रुपयांचा फायदा करून घ्यायचा अशी त्यांची नीती सुरू आहे.

दोन मंत्र्यांनी आमदाराला घेरलं, पण घडलं भलतंच... आमदाराने दिला इशारा, मंत्र्यांना फुटला घाम
MP RAKSHA KHADSE, EKNATH KHADSE, GIRISH MAHAJAN AND GULABRAO PATILImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Oct 22, 2023 | 7:19 PM

जळगाव | 22 ऑक्टोंबर 2023 : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर महसूल विभागाने कारवाई केलीय. गौण खनिज घोटाळा प्रकरणी 137 कोटींच्या दंडाची नोटीस एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला बजावण्यात आलीय. या नोटीसवरून जळगाव जिल्ह्यातील राजकारण तापलंय. ही कारवाई राजकीय द्वेषातून झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. त्यावरून जिल्ह्यातील दोन मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील विरुद्ध खडसे असा सामना रंगलाय. या दोन मंत्र्यांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, खडसे यांनी त्या मंत्र्यांनाच सूचक इशारा दिलाय.

राजकीय रंग देऊ नये

एकनाथ खडसे यांना महसूल विभागाने 137 कोटीची दंडाची नोटीस पाठविली. यावरून शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी शासनाच्या प्रतिनिधींना दंडाची नोटीस बजावली असेल तर नक्कीच ‘दाल में कूछ काला है’ असा टोला लगावला होता. प्रशासनाने कारवाईचे आदेश केल्यामुळेच ती कारवाई होईल. तहसीलदार कोणत्या पक्षाचा आहे का? ज्या ठिकाणाहून गौण खनिजाची चोरी झाली त्याचे मोजमाप निष्पन्न झाल्यानंतरच ही कारवाई झाली असेल. त्यामुळे या कारवाईला राजकीय रंग देऊ नये अशी अपेक्षा आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले होते.

उंदीर आले होते का?

भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनीही खडसे यांच्यावर उगाचं आमच्या नावाने खडे फोडू नका? चोऱ्या तुम्ही करता आणि खडे आमच्या नावाने फोडता. उलटे सुलटे प्रयोग केले आहेत आणि दोष आम्हाला देता. आता उत्तर द्या! तो डोंगर कोणी खोदला, उंदीर आले होते का खोदायला? अशी टीका केली होती.

आधे इधर, आधे उधर

मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही खासदार रक्षा खडसे आणि आमदार एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली. ही कारवाई राजकीय आकसापोटी म्हणत असाल तर आमच्यावरही कारवाई झाल्या आहेत. मी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. तुम्हाला 137 कोटी रुपयाचा दंड झाला त्यामुळे त्यांच्या सरकार विरोधी भावना बनल्या आहेत. आधी सरकार चांगलं होतं. आता तुमच्यावर कारवाई झाली तर सरकार चुकीचं झालं का? खडसे कुटुंबियांची आधे इधर, आधे उधर आणि त्यातून कोट्यवधी रुपयांचा फायदा करून घ्यायचा अशी नीती सुरू आहे असेही आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले.

तर पुराव्याने सादर करा

आमदार चंद्रकांत पाटील यांनी खासदार रक्षा खडसे यांचे नाव घेतल्यावर त्याही रणांगणात उतरल्या. मुक्ताईनगरचे आमदार सातत्याने काहीही तथ्य नसलेले आणि बिनगुडाचे आरोप राजकीय हौसापोटी आमच्यावर करताहेत. आम्हाला बदनाम करायचा हा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी पुराव्यानिशी बोलावं. उद्या मी म्हणेल आमदारांच्या सुरू असलेल्या कामात अनेक भ्रष्टाचार सुरू आहे. त्यामुळे यापुढे आमदारांनी पुराव्यानिशी बोलावं. मी काही घोटाळे केले असतील तर पुराव्याने सादर करा. खरं तर सरकारनेच याकडे आधी लक्ष ठेवायला पाहिजे होतं, असे प्रत्युत्तर खासदार रक्षा खडसे यांनी दिलंय.

मै झुकने वाला नही

१३७ कोटींच्या या नोटीसवरून आणि दोन मंत्री, एक आमदार यांच्या टीकेनंतर अखेर एकनाथ खडसे यांनी या नेत्यांचा समाचार घेतला. आगामी निवडणुकीत जिल्ह्यात एकनाथ खडसे हा एकमेव कट्टर विरोधक आहे. एकनाथ खडसे जोपर्यंत आहे तोपर्यंत विरोधकांना जिल्ह्यात निवडणुका जिंकणं सोपं नाही हे माहित आहे. त्यामुळेच ही नोटीस राजकीय दबावाने पाठवली. लेकिन मै झुकने वाला नही हु, ना झुकूँगा असे सांगत एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली.

‘वो काले लोग है तो…

गुलाबराव पाटलांचा समाचार घेतान ‘वो काले लोग है तो उन्हे काला ही दिखेगा’. गुलाबराव पाटलांचे घोटाळे आम्हालाही बाहेर काढता येतात. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत कोणती कामे सुरु आहेत. त्यात काय सुरू आहे ते गुलाबराव पाटील यांनी सांगावे. या घोटाळ्यात आणखी कोण कोण सामील आहेत ते माहित आहे. वेळ आल्यास सर्वांची नावे जाहीर करू असा इशारा देत मंत्र्याची तोंडे बंद केलीत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.