Chandrapur Tiger death : ‘त्याच’ तळ्याकाठी आणखी दोन वाघांचे मृतदेह, ताडोबातील संपूर्ण तलावात विष कालवलं?

घनदाट जंगलात आणखी दोन वाघांचे कुजलेले मृतदेह आढळून आले आहेत. अवघ्या चार दिवसात तीन वाघ मृत आढळल्याने खळबळ उडाली आहे. (Chandrapur two more tigers death)

Chandrapur Tiger death :  'त्याच' तळ्याकाठी आणखी दोन वाघांचे मृतदेह, ताडोबातील संपूर्ण तलावात विष कालवलं?
Follow us
| Updated on: Jun 15, 2020 | 11:59 AM

चंद्रपूर : चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुन्हा दोन वाघांचे कुजलेले मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. 10 जून रोजी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर असलेल्या सीतारामपेठ या गावालगतच्या तळ्याच्या काठावर एका पूर्ण वाढीच्या वाघिणीचा मृतदेह आढळून आला होता. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची चर्चा अजून सुरुच असताना, याच भागातल्या घनदाट जंगलात आणखी दोन वाघांचे कुजलेले मृतदेह आढळून आले आहेत. अवघ्या चार दिवसात तीन वाघ मृत आढळल्याने खळबळ उडाली आहे. (Chandrapur two more tigers death)

या भागातील गस्ती पथकाला कुजलेल्या अवस्थेतील हे मृतदेह आढळून आले आहेत. हे मृतदेह एक ते दीड वर्षे वयाच्या प्रौढ होऊ घातलेल्या बछड्यांचे असावेत असा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे हे मृत्यू ज्या तळ्याच्या आसपास झाले आहेत तिथेच काही माकडांचा ही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

हे तळेच दूषित झाले आहे काय किंवा कुणी या तळ्यातील पाण्यात मुद्दाम विष कालवले काय? याचा तपास वनविभाग करणार आहे. यासाठी या तळ्याच्या पाण्याचे नमुने वनविभागाने ताब्यात घेतले आहेत. दरम्यान ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प ज्या वाघांसाठी ओळखला जातो त्या वाघांचे चार दिवसात तीन मृतदेह आढळून आल्याने वनविभाग मात्र हादरून गेला आहे.

सीतारामपेठ हे गाव प्रकल्पाच्या अगदी सीमेवर आहे. या गावात कसल्या जाणाऱ्या शेतजमिनी देखील आहेत. त्यापैकी कुणी वाघांच्या वावरामुळे संतापून असे विषप्रयोग केले का? याचाही तपास वनविभागाला करावा लागणार आहे. सध्यातरी ताज्या दोन्ही ठिकाणचे नमुने ताब्यात घेत या प्रकरणाचा तपास स्वयंसेवी संस्था- वन्यजीव तज्ञ आणि वरिष्ठ वनाधिकारी करत आहेत. ताडोबातील वाघांच्या मागे कुणी मुद्दाम लागले आहे काय? हा तपासही वनविभागाच्या रडारवर असणार आहे.

(Chandrapur two more tigers death)

संबंधित बातम्या  

ताडोबा गाईडसाठी नवे नियम, भाषेच्या ज्ञानासह शैक्षणिक पात्रतेतही मोठे बदल  

‘मोगली’नंतर खराखुरा ‘बगिरा’ चंद्रपूरच्या ताडोबात दिसला! 

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.