Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

येरवडा तुरुंगातून साताऱ्यात आलेले दोन कैदी कोरोना पॉझिटिव्ह, 15 अन्य कैदी क्वारंटाईन

पुणे येथील येरवडा कारागृहातून सातार्‍यातील कारागृहात पाठवलेल्या दोन कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे (Prisoners infected with Corona Virus in Satara).

येरवडा तुरुंगातून साताऱ्यात आलेले दोन कैदी कोरोना पॉझिटिव्ह, 15 अन्य कैदी क्वारंटाईन
Follow us
| Updated on: May 03, 2020 | 1:07 AM

सातारा : कोरोना विषाणूंने तुरुंगातही शिरकाव केल्याचं समोर आलं आहे. सातारा जिल्ह्यात आज (2 मे) कोरोनाचे 5 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे यामध्ये पुणे येथील येरवडा कारागृहातून सातार्‍यातील कारागृहात पाठवलेल्या दोन कैद्यांचाही समावेश आहे (Prisoners infected with Corona Virus in Satara). या दोन कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्याने त्यांच्या संपर्कातील 15 जणांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्वतः याची माहिती दिली आहे.

साताऱ्यात शुक्रवारी (1 मे) एकाच दिवसात कोरोनाचे 25 रुग्ण सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्याच पार्श्‍वभूमीवर आज सकाळपर्यंत कोरोनाचे 5 नवीन रुग्णांची नोंद झाली. पुणे येथील येरवडा कारागृहातून सातार्‍यातील कारागृहात 46 कैदी पाठवण्यात आले होते. या 46 कैद्यांपैकी 2 कैदी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे सातारा शहर पोलीस स्टेशनसह जिल्हा कारागृहात खळबळ उडाली आहे.

आज नव्याने सापडलेल्या कोरोना बाधितांमध्ये कराड येथील कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या कोरोना बाधिताच्या निकवर्तीयाचाही समावेश आहे. तसेच फलटण येथील कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेले 1, कराड येथून कोरेगाव येथे प्रवास करुन आलेला 1 आणि पुण्यातून सातारा कारागृहात आलेल्या 2 कैद्यांचा यात समावेश आहे. जिल्हा कारागृहात मोठ्या संख्येने कैदी आहेत. अशातच पुण्याहून आणलेल्या कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे जिल्हा कारागृहात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्रात दिवसभरात 790 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, आकडा 12,296 वर

महाराष्ट्रात आज (2 मे) दिवसभरात 790 नव्या (Corona Victims In Maharashtra) कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 12 हजार 296 वर पोहोचली आहे. तर, आज राज्यात दिवसभरात 36 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त आज दिवसभरात 121 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी (Corona Victims In Maharashtra) सोडण्यात आलं आहे.

36 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, मृतांचा आकडा 521 वर

आज राज्यात 36 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या आता 521 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू हे मुंबईत झाले आहेत. आज मुंबईत 27 जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला. तर पुणे शहरातील 3, अमरावती शहरातील 2, वसई विरारमधील 1, अमरावती जिल्ह्यातील 1, औरंगाबादमधील एकाचा मृत्यू झाला आहे. तर पश्चिम बंगालमधील एकाचा मुंबईत मृत्यू झाला.

संबंधित बातम्या :

Corona Update : महाराष्ट्रात दिवसभरात 790 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, आकडा 12,296 वर

मुंबईतही अवघ्या 15 दिवसात 1 हजार खाटांचं कोरोना रुग्णालय उभारणार, काम सुरु

मुंबईत मेडिकल सर्टिफिकेटसाठी मजुरांची रांग, घरी जाण्यासाठी कागदांची जुळवाजुळव

Prisoners infected with Corona Virus in Satara

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.