जिल्हाबंदी मोडून पुण्यापर्यंत जाऊन दाखव, हुल्लडबाजांची पैज, सोलापुरातील दोघांवर गुन्हा
कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन असताना, अनेक हुल्लडबाज या लॉकडाऊनचं (Solapur youths break lockdown) उल्लंघन करताना दिसत आहेत.
सोलापूर : कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन असताना, अनेक हुल्लडबाज या लॉकडाऊनचं (Solapur youths break lockdown) उल्लंघन करताना दिसत आहेत. कोणी मॉर्निंग वॉकच्या नावाखाली, कोणी भाजी आणण्यासाठी, तर कोणी फेरफटका मारण्यासाठी बाहेर फिरताना दिसत आहेत. सोलापुरात तर दोन महाभागांनी लॉकडाऊन मोडण्याचीच पैज लावली. (Solapur youths break lockdown)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेला लॉकडाऊन आणि सरकारने प्रतिबंधित केलेल्या जिल्हाबंदीचा आदेश मोडून, पुण्याला जाऊन येण्याचा विडा या दोन महाभागांनी उचलला. त्यासाठी हे दोघे सोलापुरातून दुचाकीवरुन पुण्याकडे रवाना झाले. त्यांनी वाटेतील पोलिसांना चुकवत पुण्यापर्यंतचा प्रवास केला. मात्र ते पुण्यातील चाकण पोलिसांच्या नजरेतून ते सुटले नाहीत. पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांनी गावाकडचा रस्ता धरला खरा, मात्र गावात आल्यानंतर त्यांना आता गावातीलच शाळेत क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
या दोन्ही तरुणांवर बार्शी पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. बार्शी तालुक्यातील नागोबावाडी इथला हा प्रकार असून, अशा प्रकारच्या पैजांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या 14 वर
सोलापूर शहरात आज कोरोनाचा नवा रुग्ण आढळला. त्यामुळे सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 14 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात एकाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे सोलापूर जिल्हा आता रेड झोनच्या उंबरठ्यावर आहे. आजचा पॉजिटीव्ह रुग्णही पाछा पेठ परिसरातीलच आहे. दुसरीकडे 165 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
शहरात खबरदारीचा उपाय म्हणून बफर झोन जाहीर केलेल्या भागात महानगर पालिकेकडून फवारणी सुरु आहे. बफर झोनमध्ये कोणालाही प्रवेश नाही. रोज दहा हजार सॅनेटायझरची मेडिकलमधून मागणी होत आहे. त्यामुळे सॅनिटायझरची महिन्याची विक्री केवळ एकाच दिवसात होत आहे.