आयुष्यातील शेवटचा पेपर ठरला; परीक्षेनंतर पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा धरणाच्या गाळात पाय रुतून मृत्यू
मुक्त विद्यापीठाचा पेपर दिल्यानंतर या दोन मृत मुलांसह 8 जण विरचक्क धरणात पोहायले गेले होते. यातील राहुल सुनील वाकडे आणि कल्पेश भगवान सोनवणे या दोघांचा मृत्यू झाला आहे. तलावात गाळ असल्याने यात पाय रुतून मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर धरण परिसरात परिवाराचा आक्रोश पहायला मिळाला.
नंदुरबार : नंदुरबारमध्ये (Nandurbar) एक धक्कादायक घटना घडली आहे. धरणात पोहायला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचां बुडून मृत्यू झाला आहे. परीक्षेनंतर हे दोघे जण आपल्या मित्रांसह विरचक्क धरण परीसरात फिरायला गेले होते. यावेळी त्यांच्यासह ही दुर्दैवी घटना घडली.
मुक्त विद्यापीठाचा पेपर दिल्यानंतर या दोन मृत मुलांसह 8 जण विरचक्क धरणात पोहायले गेले होते. यातील राहुल सुनील वाकडे आणि कल्पेश भगवान सोनवणे या दोघांचा मृत्यू झाला आहे. तलावात गाळ असल्याने यात पाय रुतून मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर धरण परिसरात परिवाराचा आक्रोश पहायला मिळाला.
त तरुण मित्रांसह नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक्क धरणात पोहायला गेले होते. सध्या मुक्त विद्यापीठाचा पेपर सुरू असल्याने आज शेवटचा पेपर होता. तो पेपर आपटून विद्यार्थी एकत्र पोहोण्यासाठी गेले होते. जिजामाता महाविद्यालय येथील मुक्त विद्यापीठाचे ते विद्यार्थी होते.
8 मुले विरचक्क धरणात पोहायला गेली होती. सध्या धरणात पाणीसाठा कमी झाला असून मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे त्यामुळे दोन विद्यार्थ्यांच्या गाळात पाय रुतल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. राहुल सुनील वाकडे आणि कल्पेश भगवान सोनवणे या दोघांचा मृत्यू झाला. या विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या या अचानक जाण्यामुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रायगडमध्ये तरूण वाहून गेला
पुराच्या पाण्यात वाहून आला 17 वर्षाच्या तरुणाचा मृतदेह
वसईत पुराच्या पाण्याने वाहून आलेला एका 17 वर्षाच्या तरुणाचा मृतदेह सापडला आहे.
राहुल नंदलाल विषवकर्मा असे या 17 वर्षाच्या मुलाचे नाव असून तो वसईच्या गावाराई पाडा येथील रहिवासी आहे.
सोमवारी हा तरुण वसईच्या वालीव भागातील कंपनीत कामाला गेला होता. सायंकाळी 7 वाजता तो कंपनीतून बाहेर पडल्या नंतर तो घरी पोहचण्याऐवजी बेपत्ता झाला होता.
बुधवारी दुपारी 4 च्या सुमारास वसईच्या मधूबन परिसरातील लोखंडी ब्रिज जवळ नाल्यात वाहत आलेला त्याचा मृतदेह पोलिसांना मिळाला आहे.