गरम पाण्याने डोकं थंड करण्यासाठी महाड गाठलं, केंद्रीय पाहणी पथकाच्या प्रमुखांवर सामंतांची नाराजी

नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकांच्या प्रमुखांबाबत एक वेगळाच अनुभव समोर आला आहे (Uday Samant on Central Committee observing Kokan).

गरम पाण्याने डोकं थंड करण्यासाठी महाड गाठलं, केंद्रीय पाहणी पथकाच्या प्रमुखांवर सामंतांची नाराजी
Follow us
| Updated on: Jun 18, 2020 | 9:16 PM

रत्नागिरी : निसर्ग वादळाने कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकांच्या प्रमुखांबाबत एक वेगळाच अनुभव समोर आला आहे (Uday Samant on Central Committee observing Kokan). केंद्रीय पाहणी पथकाच्या प्रमुखांनी गरम पाण्याने डोकं थंड करण्यासाठी पाहणी दौरा बाजूला करुन थेट महाड गाठलं. यावर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनाच आल्याने त्यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली.

उदय सामंत म्हणाले, “केंद्रीय पथकाच्या इतर सदस्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. पण त्यांचे चेअरमन मात्र अत्यंत बिझी होते. दापोलीत त्यांना नेटवर्क मिळत नसल्यानं ते कावरेबावरे झाले होते. शिवाय, डोक्यावर गरम पाणी नसेल, तर डोकं थंड होणार नाही असं सांगत त्यांनी थेट महाड गाठलं.” केंद्रीय पथकाच्या प्रमुखांच्या या वागण्यावर उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय पाहणी पथकाच्या इतर सदस्यांकडून चांगलं सहकार्य मिळाल्याचंही नमूद केलं.

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी भागातील घरांचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर आता राज्य सरकारकडे कोकण आयुक्तांनी मदतीसाठी भरीव अशी रकमेची मागणी केली. दरम्यान, आयुक्तांच्या या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. स्वतः उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कोकणाला 360 कोटींची मदत मिळणार असल्याची माहिती दिली. यापैकी 130 कोटींची रक्कम ही रत्नागिरी जिल्ह्याला मिळणार आहे. ही रक्कम 19 जूनला संध्याकाळपर्यंत जिल्ह्याच्या ताब्यात देण्यात येणार आहे, असंही उदय सामंत यांनी नमूद केलं.

दरम्यान, या पथकाने रायगड जिल्ह्यात ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचीही 16 जूनला पाहणी केली. गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. या पथकाने या नुकसानीची पाहणी केली. मुंबईहून भाऊचा धक्का मार्गे रो-रो बोटीने हे पथक अलिबागला आलं. सकाळी 10.40 वाजता नागावमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर चौल येथे पाहणी करुन मुरुड तालुक्यातील बोर्लीला गेलं. त्यानंतर काशिद, नांदगाव येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

दुपारी 2.15 वाजता मुरुड तालुक्यातील प्रकृती रिसॉर्टमध्ये चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांचे सादरीकरण केल्यानंतर मुरुड तालुक्यातील आगरदांडाकडे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार, हरिहरेश्वर येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन पथकाचा रात्री महाड येथे मुक्काम झाला.

हेही वाचा :

Cyclone Nisarga | केंद्रीय पथक रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर, चक्रीवादळाने झालेल्या नुकसानाची पाहणी

चक्रीवादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत, 4 लाखांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत

Uday Samant on Central Committee observing Kokan

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.