Mahad Building Collapse | 35 जणांचे प्राण वाचवताना दोन पाय गमावले, महाडच्या नावेदला शिवसेनेकडून 2 लाखांची मदत

महाड दुर्घटनेत अनेकांचे प्राण वाचविणाऱ्या नावेद यांची मंत्री उदय सामंत यांनी रुग्णालयात भेट घेतली. (Uday Samant Meet Mahad Building Collapse Naved)

Mahad Building Collapse | 35 जणांचे प्राण वाचवताना दोन पाय गमावले, महाडच्या नावेदला शिवसेनेकडून 2 लाखांची मदत
Follow us
| Updated on: Sep 01, 2020 | 6:31 PM

नवी मुंबई : महाडमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तारिक गार्डन ही पाच मजली इमारत 24 ऑगस्टला संध्याकाळच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत अनेकांचे प्राण वाचविणाऱ्या नावेद यांची उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रुग्णालयात भेट घेतली. त्यावेळी शिवसेनेच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत करण्यात आली. (Uday Samant Meet Mahad Building Collapse Naved real hero who save 35 life)

महाड दुर्घटनेत आपल्या जिवाची पर्वा न करता नावेद यांनी 35 व्यक्तींचे प्राण वाचवले. मात्र दुर्देवाने त्याच्यावर आपले दोन्ही पाय गमाविण्याची वेळ आली आहे. सध्या नेरूळ येथील अपोलो रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याची तब्ब्येत आता चांगली असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

नावेदला आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. त्याच्या तब्ब्येतीमध्ये सुधारणा होत आहे. तो लवकर बरा होईल, असे उदय सामंत म्हणाले.

नावेद यांनी महाड दुर्घटनेत अत्यंत महत्वपूर्ण आणि शौर्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याच्या शौर्याची दखल घेऊन त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. तसेच त्याच्या तब्बेतीबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली. नावेद यांची प्रकृती व्यवस्थित आहे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्याशिवाय शिवसेनेच्या वतीने नावेद यांच्या कुटुंबियांना 2 लाख रूपयांची मदत करण्यात आली.

नेमकी घटना काय?

महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत काजलपुरा भागात 05 मजली इमारत 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या सुमारास कोसळली. या इमारतीचं नाव तारीक गार्डन असं होतं. यामध्ये 45 ते 47 फ्लॅट होते. या दुर्घटनेत अनेक रहिवाशी अडकले होते. त्यानंतर प्रशासनाने युद्ध पातळीवर बचाव कार्य करण्यास सुरुवात केली. यातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.

तब्बल पाच मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. इमारतीचा पाया खचल्यामुळे ती आहे तशीच खाली बसली. एखादी इमारत तयारी करुन पाडली जाते, अगदी तसंच वाटावं, अशी ही इमारत जागच्या जागी खाली बसली. या दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Uday Samant Meet Mahad Building Collapse Naved real hero who save 35 life)

संबंधित बातम्या :

महाड दुर्घटनेप्रकरणी बिल्डरसह 5 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख, तर जखमींना 50 हजारांची मदत, मंत्री वडेट्टीवारांची घोषणा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.