आदित्य ठाकरेंच्या ट्विटनेच सिद्ध झालं, आम्ही काय केलं? वेदांतावरून उद्योगमंत्री उदय सामंतांचं स्पष्टीकरण
भाजप नेते आशिष शेलार यांनी या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. यातून महत्त्वाची माहिती पुढे येऊ शकते, असं वक्तव्यही सामंत यांनी केलंय.
मुंबईः वेदांता प्रकल्प (Vedanta Foxconn) महाराष्ट्रात आणण्यासाठी हाय पॉवर समितीची बैठक झाली, पण त्यानंतरही हा प्रकल्प कसा निसटला, या आशयाचं ट्विट माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलंय. हाच मुद्दा उचलून धरत आदित्य ठाकरे यांनी आज रत्नागिरीत शिंदे (CM Eknath Shinde) सरकारवर टीका केली. मात्र आदित्य ठाकरेंच्या ट्विटमुळेच हे सिद्ध होतंय की आमच्या सरकारने हाय पॉवर कमिटीची बैठक घेतली आणि वेदांता प्रकल्प राज्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या सरकारने सात महिन्यात मात्र कागदोपत्री एकही व्यवहार केला नाही, असा आरोप उदय सामंत यांनी केलाय. तसेच भाजप नेते आशिष शेलार यांनी या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. यातून महत्त्वाची माहिती पुढे येऊ शकते, असं वक्तव्यही सामंत यांनी केलंय.
Published on: Sep 16, 2022 05:16 PM
Latest Videos