सातारा : भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे आपल्या युनिक स्टाईलमुळे कायम चर्चेत असतात. भरदस्त शरिरयष्टी आणि तेवढ्याच वजनदार देहबोलीमुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाची प्रत्येकाच्या मनावर छाप पडते. तर कधी त्यांचा मिश्किल स्वभाव आणि हजरजबाबीपणाचीही तेवढीच चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात होत असते. सध्या देशभरात व्हॅलेंटाईन डेची (valentines day) धूम आहे. तरुण-तरुणी तसेच विवाहित जोडपीसुद्धा हा दिवस आनंदात साजरा करतात. आपल्या जोडीदाराप्रतिचे प्रेम व्यक्त करतात. याच व्हॅलेंटाईन डेवर विचारलेल्या प्रश्नावर उदयनराजेंनी मिश्किल उत्तर दिलं आहे. पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला आपल्या खास शैलीत त्यांनी ‘माझे अजून वय झाले नाही’ असं मिश्किलपणे म्हटलंय. (Udayanraje Bhosale comment on valentines day)
खासदार उदयनराजे भोसले हे साताऱ्यात पत्रकारांशी वार्तालाप करत होते. यावेळी त्यांनी राज्यातील तसेच देशातील अनेक गंभीर मुद्द्यांवर भाष्य केले. आगामी शिवजंयतीसाठी राज्य सरकारने जारी कलेल्या मुद्द्यावरसुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी एका पत्रकाराने त्यांनी ”आज आपण पाढंरा शर्ट न घालता रंगीत शर्ट घातला आहे. व्हॅलेंटाईन डेसाठी हे स्पेशल आहे का?,” असा प्रश्न विचारला. पत्रकाराच्या या खास प्रश्नाला उदयनराजे यांनी हजरजबाबीपणा दाखवत आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. “हो स्पेशल आहे आणि तुम्ही म्हातारे झाला आहात. मी नाही” असे मजेशीर उत्तर दिले. त्यांच्या या उत्तरानंतर काही काळासाठी हशा पिकला होता.
पाहा उदयनराजेंचे मिश्किल उत्तर :
उदयनराजे भोसले यांनी शिवजयंती साजरी करण्यासाठी राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधावर प्रतिक्रिया दिली आहे. “कोरोनाच्या महामारीमध्ये अनेकांनी जवळची लोकं गमावली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या देशाची अस्मिता आहेत. त्यांची जयंती ही झालीच पाहिजे. परंतु आपल्या लोकांची काळजी घेणे ही आपली आणि शासन अशा सर्वांचीच जवाबदारी आहे. शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी सुद्धा असाच विचार केला असता. त्यांनी लोकांना नेहमी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. त्यामुळे शिवजयंती साजरी जरूर करा, पण स्वतःची सुद्धा काळजी घ्या,” असे उदयनराजे भोसले म्हणाले.
PHOTO | उत्तराखंडच्या दुर्घटनेत प्राण्यांनीही गमावलीत कुटुंब, तीन पिल्लांच्या शोधात 7 दिवस भटकतोय श्वान!#Uttarakhand | #UttarakhandGlacierBurst | #dogs | #Uttarakhand_Disaster https://t.co/mE68Rfl617
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 14, 2021
इतर बातम्या :
(Udayanraje Bhosale comment on valentines day)