“आता विष पिणार नाही तर पाजणार”, मराठा आरक्षणावरुन उदयनराजे कडाडले
आता मी विष पिणार नाही, आता यांना विष पाजणार अशा कठोर शब्दात भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला. (udayanraje bhosale maha vikas aghadi maratha reservation)
सातारा : आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा ( Maratha reservation) समाजामध्ये मोठी अस्वस्थता आहे. आरक्षणाला घेऊन विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला आहे. आता याच मुद्द्यावर बोलताना आता मी विष पिणार नाही, आता यांना विष पाजणार अशा कठोर शब्दात भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी संताप व्यक्त केला. सत्तेत बसणारे ज्या भावनेने निवडून त्या भावनेला त्यांनी न्याय द्यावा. हे राजकारण नाही तर गचकरण झाले आहे. आता मी विष पिणार नाही, त्यांना विष पाजणार, असे उदयनराजे म्हणाले. ते साताऱ्यात बोलत होते. (Udayanraje Bhosale slams Maha Vikas Aghadi government on Maratha reservation)
अनेक नेत्यांना भेटलो त्याचा उपयोग झाला नाही
मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन उदयनराजे भोसले यांनी राज्यातील विविध नेत्यांना भेटी दिल्या. त्यांनी या भेटीत मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला. मात्र, या भेटींविषयी बोलताना त्यांनी या भेटीचा काही उपयोग झाला नसल्याचे म्हणत नाराजी व्यक्त केली. “मराठा आऱक्षणाच्या संदर्भात राज्यसरकारची माणस कोर्टात हजर होत नाहीत. राज्य सरकारने काय दिवे लावले ते लोकांना कळायला पाहिजे. राज्य सरकारने श्वेतपत्रिका आणावी. जगात जात नसती तर भांडण झाले नसते. सगळे एकत्र राहिले असते. ते आता एकमेकाशी बोलत नाहीत. मी अनेक नेत्यांना भेटलो पण त्याचा उपयोग झाला नाही असे वाटते,” असे उदयनराजे म्हणाले.
सरकारने काय दिवे लावले ते लोकांना कळू द्या
तसेच पुढे बोलताना मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या मानसिक परिस्थितीविषयी भाष्य केले. “छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही राजकारण केल नाही. म्हणून स्वराज्याची स्थापना झाली. मराठा कुटुंबात मी जन्मलो म्हणून नाही तर वाटत प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजेत अशी माझी भूमिका आहे. मराठा आरक्षणाच्या मागण्या रास्त आहेत. मराठा सामाजातील अनेक मुलांनी आत्महत्या केल्या. अशामुळे मराठा मुले फस्ट्रेशनमध्ये येणार नाहीत का?,” असे उदयनराजे म्हणाले. तसेच, राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर श्वेदपत्रिका काढावी. सरकारने काय दिवे लावले ते लोकांना कळू दिले पाहिजे,” असा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावला.
इतर बातम्या :
Pune MPSC Student Protest | MPSC परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, पुण्यात राडा
VIDEO | हिंदी गाण्यावर लावणीचा ठसका, पाहा चिमुकल्या किंजलचा भन्नाट डान्स व्हिडीओ
(Udayanraje Bhosale slams Maha Vikas Aghadi government on Maratha reservation)