सर्वस्व गमावल्यानंतर उद्धव ठाकरे एक्शन मोडमध्ये, मोदी यांच्याविरोधात असा आहे प्लॅन

शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदेंना मिळाल्यानंतर मोदी आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरेंनी आता मोदी विरोधी आघाडीसाठी प्रयत्न सुरु केलेत.

सर्वस्व गमावल्यानंतर उद्धव ठाकरे एक्शन मोडमध्ये, मोदी यांच्याविरोधात असा आहे प्लॅन
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 11:48 PM

मुंबई : शिवसेना हातून निसटल्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आघाडी उभारण्यासाठी ठाकरे यांचा प्लॅन असून देशभरातील विरोधकांना त्यांनी फोन केलेत. तसंच 5 मार्चपासून उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा दौराही करणार आहेत. शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदेंना मिळाल्यानंतर मोदी आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरेंनी आता मोदी विरोधी आघाडीसाठी प्रयत्न सुरु केलेत.

मोदी-शाहांविरोधी आघाडीसाठी ठाकरेंनी देशभरातल्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना फोन केलेत.बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केंजरीवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी उद्धव ठाकरेंनी फोन वरुन चर्चा केलीय.

ठाकरे गट विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची मार्चमध्ये मुंबईत सभा आयोजित करणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न ठाकरेंनी सुरु केलाय.

हे सुद्धा वाचा

दुसरीकडे उद्धव ठाकरे, महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत.उद्धव ठाकरेंच्या सभेची सुरुवात 5 मार्चपासून रत्नागिरीच्या खेडपासून होणार आहे.

महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा करण्याआधी शिवसेना भवनात जिल्हा प्रमुखांच्या बैठका झाल्या .या बैठकीतून उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला.

सुपारी देऊन शिवसेनेची हत्या करण्याचा प्रयत्न होतोय. भाजपचे तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला नाही. शिवसेनाप्रमुख गेले तेव्हासारखाच आताचा प्रसंग आहे.शिवसेना भवनातील बैठकीत ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांना भावनिक साद घातली.

मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास यादवी माजेल, उन्माद वाढेल. तसंच उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान दिलंय. स्वत:च्या वडिलांचं नाव आणि फोटो लावून पक्ष चालवून दाखवा, असं आव्हान ठाकरेंनी शिंदेंना दिलंय.

अमित शाह नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येवून गेलेत. कोल्हापुरात अमित शाहांनी लोकसभेच्या सर्व 48 जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला होता. अमित शाहांच्या या दाव्याची उद्धव ठाकरेंनी खिल्ली उडवलीय.

उद्धव ठाकरेंची सध्या दुहेरी परीक्षा आहे. सुप्रीम कोर्टातली लढाई जिंकण्याचं आव्हान आहे. तर पक्ष गमावल्यानं स्वत: पुन्हा सिद्ध करावं लागेल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.