LIVE : अयोध्या दौरा – मुंबईहून निघालेली शिवसैनिकांची ट्रेन अयोध्येत दाखल
अयोध्या : मुंबईहून निघालेली शिवसैनिकांची विशेष ट्रेन अयोध्येत दाखल झाली आहे. जय श्री रामच्या घोषणा देत शिवसैनिक रामजन्मभूमीवर दाखल झाले आहेत. शिवसैनिकांनी जय श्री रामच्या घोषणांनी स्टेशन परिसर दणाणून सोडला होता. मुंबईहून गेलेल्या ट्रेनमध्ये दीड हजारांपेक्षा जास्त शिवसैनिक आहेत. तर नाशिकहून निघालेल्या ट्रेनमध्येही एवढेच किंवा यापेक्षा जास्त शिवसैनिक असण्याची शक्यता आहे. नाशिकहून निघालेली ट्रेन अयोध्येत पोहोचण्यासाठी […]
अयोध्या : मुंबईहून निघालेली शिवसैनिकांची विशेष ट्रेन अयोध्येत दाखल झाली आहे. जय श्री रामच्या घोषणा देत शिवसैनिक रामजन्मभूमीवर दाखल झाले आहेत. शिवसैनिकांनी जय श्री रामच्या घोषणांनी स्टेशन परिसर दणाणून सोडला होता. मुंबईहून गेलेल्या ट्रेनमध्ये दीड हजारांपेक्षा जास्त शिवसैनिक आहेत. तर नाशिकहून निघालेल्या ट्रेनमध्येही एवढेच किंवा यापेक्षा जास्त शिवसैनिक असण्याची शक्यता आहे. नाशिकहून निघालेली ट्रेन अयोध्येत पोहोचण्यासाठी उशिर होणार आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. महाराष्ट्रापासून ते अयोध्येपर्यंत शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारल्याचं चित्रं आहे. उद्धव ठाकरे शनिवारी अयोध्येला रवाना होणार आहेत. पण, त्याआधीच त्यांनी शिवनेरी किल्ल्यावरुन आपल्या दौऱ्याचं रणशिंग फुंकलंय. अयोध्या दौऱ्यात उद्धव ठाकरेंसोबत त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेही असतील.
या ऐतिहासिक दौऱ्यासाठी महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक स्पेशल ट्रेनद्वारे अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. काही पदाधिकारी विमानातूनही अयोध्येत दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत देखील शिवसेनेने जोरदार तयारी केली असून महाराष्ट्रातही शिवसैनिकांमध्ये अयोध्या दौऱ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे.
अयोध्येत पोहोचलेल्या शिवसैनिकांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. रस्त्यानेही त्यांच्या खाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवासात कोणतीही अडचण आली नसल्याचं शिवसैनिकांनी अयोध्येत पोहोचल्यानंतर सांगितलं. अयोध्येतील मंदिर परिसरातील धर्मशाळा आणि इतर ठिकाणी शिवसैनिकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, ट्रेन जाणिवपूर्वक लेट केली जात असल्याचा आरोप रेल्वेकडून फेटाळण्यात आला आहे. विशेष ट्रेनचं वेळापत्रक नेहमीच मागेपुढे होत असतं असं रेल्वेचं म्हणणं आहे. नाशिकहून निघालेल्या विशेष ट्रेनने अयोध्येत 36 तासात पोहोचणं अपेक्षित होतं. पण यापेक्षाही जास्त उशिरा होणार असल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
प्रत्येक अपडेट टीव्ही 9 मराठीवर
उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची प्रत्येक अपडेट टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर आणि चॅनलवर पाहता येणार आहे. टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी मुंबईपासून ते अयोध्येपर्यंतची प्रत्येक अपडेट प्रेक्षक आणि वाचकांपर्यंत पोहोचवणार आहेत. लाईव्ह अपडेटसाठी टीव्ही 9 मराठीला @tv9marathi या नावाने ट्विटर आणि फेसबुकला फॉलो करु शकता.
उद्धव ठाकरेंचा दौरा कसा असेल?
शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीचा कलश घेऊन उद्धव ठाकरे शनिवारी दुपारी अयोध्येत पोहोचतील. शिवनेरीवर बाल शिवाजी आणि जिजामाता यांना अभिवादन करुन उद्धव ठाकरेंनी माती सोबत घेतली होती.
अयोध्येतल्या क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य असे वेगवेगळे समाज, भोजपुरी सभा यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे. ‘लक्ष्मण किला’वर उद्धव ठाकरे यांचा साधुसंतांकडून सत्कार होईल. रामचरित मानस आणि रामललांची मूर्ती घेऊन उद्धव ठाकरे येणार आहेत. पूजेनंतर ते साधूसंतांकडून आशीर्वाद घेतील. ‘लक्ष्मण किला’वरील कार्यक्रम संपल्यानंतर उद्धव ठाकरे चालत शरयूच्या काठावर जाऊन आरती करतील.
राम मंदिरासाठी अध्यादेश आणा : संजय राऊत
2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा प्रतिष्ठेचा विषय बनलाय. शिवसेना पक्षप्रमुख शनिवारी आणि रविवारी अयोध्येत असतील. त्यांच्या स्वागतासाठी हजारो शिवसैनिक रामजन्मभूमीवर दाखल झाले आहेत. खासदार संजय राऊत अगोदरपासूनच अयोध्येत दौऱ्याची तयारी करत आहेत.
राम मंदिर बनवण्यासाठी अध्यादेश आणावा अशी मागणी संजय राऊत यांनी केलीय. आम्ही 17 मिनिटात बाबरी पाडली होती, तर अध्यादेश आणायला किती वेळ लागतो? राष्ट्रपती भवनापासून ते यूपीपर्यंत भाजपचं सरकार आहे. राज्यसभेतही अनेक असे खासदार आहेत, जे राम मंदिराच्या बाजूने उभे राहतील. जो विरोध करेन, त्याचं देशात फिरणं मुश्कील होईल, असा इशाराही त्यांनी दिला.