उद्धव ठाकरे स्वतः ‘मिंधे’ झाले, बाळासाहेबांचा वारसा गेला म्हणत शिंदे गटाच्या मंत्र्याची जळजळीत टीका काय? टीका करणारे मंत्री कोण?
बाळासाहेब यांचा वारसा गेला आहे. आता त्यांनी काँग्रेसचा वारसा घेतला आहे. उद्धव ठाकरे स्वतः मिंधे झाले आहेत हे पाहायला मिळत आहे. शक्तिप्रदर्शन केल्याशिवाय आता उद्धव ठाकरे काहीही करू शकत नाहीत.
भूषण पाटील, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर : शिवसेना फूटीनंतर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल करत असतांना मिंधे गट असा शब्दप्रयोग वापरुन टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना मिंधे म्हणूनच संबोधले आहे. मात्र, त्यावर आजवर शिंदे गटाच्या कोणत्याही मंत्र्याने, आमदाराने किंवा प्रवक्त्याने पलटवार केला नव्हता. मात्र, आज कोल्हापूर येथे दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या पहिल्यांदाच आक्रमक अशी भूमिका घेलती आहे. उद्धव ठाकरे स्वतःच मिंधे असल्याचं म्हणत हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळसाहेबांचा वारसा सोडला असून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा वारसा घेतल्याची जहरी टीकाही शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. कोल्हापूर येथे दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थित प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आहे. त्यावेळी माध्यमांशी बोलत असतांना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
दीपक केसरकर माध्यमांशी बोलतांना म्हणाले, पंचगंगा प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. अंबाबाई मंदिर परिसरात सुविधा देण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.
कोल्हापूर हा महाराष्ट्रातील आणि देशातील पहिला जिल्हा बनावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोल्हापूरचं वैभव वाढलं पाहिजे त्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे.
शरद पवार आणि जयंत पाटील यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा आहे, राज्यातील 50 शाळांच्या विकासात कोल्हापुरातील मेन राजाराम हायस्कूलचा समावेश केला जाईल.
बाळासाहेब यांचा वारसा गेला आहे. आता त्यांनी काँग्रेसचा वारसा घेतला आहे. उद्धव ठाकरे स्वतः मिंधे झाले आहेत हे पाहायला मिळत आहे. शक्तिप्रदर्शन केल्याशिवाय आता उद्धव ठाकरे काहीही करू शकत नाहीत.
हिंदुत्वपासून दूर व्हा हे कधीही बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही सांगितलं नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे उत्तराधिकारी कसे होऊ शकतात असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केला आहे.
सेना आणि भाजपची युती ही बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केली आहे, शरद पवार, अजित पवार, सुप्रियाताई यांच्याबद्दल कधीही वाईट बोलणार नाही असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी उत्तराधिकारी ठाकरेचं असं म्हंटलं होतं त्यावर केसरकर यांनी टोला लगावला आहे.
आरोप करताना आदित्य ठाकरे यांनी संयम बाळगला पाहिजे, कारण ते स्वतःला आणि ठाकरे घराण्याला डॅमेज करत आहेत ते त्यांनी थांबवावं असाही सल्ला दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना दिला आहे.