उद्धव ठाकरे यांना ही भाषा शोभत नाही, रवी राणा यांनी सुनावलं

यातील राज उघडल्यानंतर मोठा भूकंप महाराष्ट्रात होईल. तेव्हा उद्धव ठाकरे हे अडचणीत येतील, असा इशारा रवी राणा यांनी दिला.

उद्धव ठाकरे यांना ही भाषा शोभत नाही, रवी राणा यांनी सुनावलं
रवी राणा
Follow us
| Updated on: Dec 26, 2022 | 8:46 PM

नागपूर : उद्धव ठाकरे किती वेळा बेळगावला गेले मला माहीत नाही. आदित्य ठाकरे यांच्या संरक्षणासाठी ते विदर्भात आले. विदर्भ संकटात होता तेव्हा कुणासाठी ते विदर्भात आले नाहीत, असा आरोप रवी राणा यांनी केला. बेळगावचा मराठी माणूस असो की, राज्यातला प्रत्येकाचं संरक्षण करण्यासाठी न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सक्षम आहेत. केंद्र सरकारचं दोन्ही राज्यांकडं लक्ष आहे. केंद्राचे गृहमंत्री स्वतः लक्ष देऊन आहेत. बेळगावातील कुणावरही अन्याय होणार नाही. बेळगावला केंद्रशासित प्रदेश करावं, अशी भाषा उद्धव ठाकरे यांना शोभत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश करावा, अशा परिस्थितीत आला होता, असं रवी राणा यांनी सुनावलं.

रवी राणा म्हणाले, सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियन हत्या प्रकरणात रुग्णालयात कर्मचाऱ्यांनी दावा केलाय की, राजपुतची आत्महत्या नसून हत्या आहे. त्यांच्या मानेवरती व्रण पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अनेकदा तो विषय नितेश राणे आणि नारायण राणे यांनी उचलला होता.

सुशांतचा पीएम रात्री झालाय. सुशांतचा पीएम रात्री करणं, व्हिडिओग्राफी न करणं फक्त फोटोग्राफी करणं. मुख्यमंत्री ठाकरे असल्यामुळं त्यावेळी या गोष्टीमधील राज अजून बाहेर आला नाही. यातील राज उघडल्यानंतर मोठा भूकंप महाराष्ट्रात होईल. तेव्हा उद्धव ठाकरे हे अडचणीत येतील, असा इशारा रवी राणा यांनी दिला.

कोल्हे प्रकरणात गुप्त विभागाकडं चौकशी लावण्यात आली आहे. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पोलीस अधिकारी आरती सिंग यांना फोन करून हत्याकांड दाबण्याचा प्रयत्न केला. त्यासंबंधीचे पुरावे गुप्त विभागाकडं देणार असल्याचं रवी राणा म्हणाले.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.