Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांच्या जवळच्याच माणसाने ‘घात’ केला? ठाकरे गटाच्या खासदाराकडून शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र

निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगातील लढाई शिंदे गट जिंकल्याचं स्पष्ट झालंय. पण या लढाईदरम्यानची एक मोठी आणि महत्त्वाची बामती समोर आलीय.

उद्धव ठाकरे यांच्या जवळच्याच माणसाने 'घात' केला? ठाकरे गटाच्या खासदाराकडून शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र
उद्धव ठाकरेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 10:53 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय दिलाय. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हावर महत्त्वाचा निकाल दिला आहे. निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगातील लढाई शिंदे गट जिंकल्याचं स्पष्ट झालंय. पण या लढाईदरम्यानची एक मोठी आणि महत्त्वाची बामती समोर आलीय. उद्धव ठाकरे यांच्या गटातील एका खासदाराने शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळालीय.

ठाकरे गटातील एका खासदाराने उलट प्रतिक्रिया दिल्याची बातमी समोर आलीय. या खासदाराने शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. निवडणूक आयोगातील कागदपत्रांमधून हा धक्कादायक खुलासा झालाय. त्यामुळे 14 वा खासदार शिंदे गटात प्रवेश करणार का? अशी चर्चा आता सुरु झालीय.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगाकडे जवळपास 24 ते 25 लाख कागदपत्रे देण्यात आले होते. त्यानुसार अनेक खासदार, आमदार, शाखाप्रमुख, विभागप्रमुख, जिल्हाप्रमुख सगळ्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. शिवसेनेचे 40 आमदार शिंदे गटात गेले होते. त्यानंतर 13 खासदार शिंदे गटात गेले होते. आता एका 14 व्या खासदाराने शिंदे गटाच्या बाजून प्रतिज्ञापत्र दिलं आहे. या खासदाराने प्रतिज्ञापत्रात आपण शिंदे गटाच्या बरोबर असल्याचं म्हटलं आहे.

शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र देणारे 14 वे खासदार हे ठाकरे गटात आहेत. पण ते गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गटापासून अलिप्त आहेत. त्यांनी ठाकरेंच्या विरोधात प्रतिज्ञापत्र दिलं आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक धक्काच आहे.

शरद पवार म्हणतात, ‘फार काही फरक पडत नाही’

दुसरीकडे निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर उद्धव ठाकरे यांच्या गटाची उमेद वाढवणारी प्रतिक्रिया दिलीय.  शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय अनुभवी आणि मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांच्या प्रत्येत प्रतिक्रियेला अतिशय महत्त्व असतं. त्यामुळे शरद पवार यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर दिलेली प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाला नवा उमेद देण्यासाठी ही प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत देशाच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेस पक्षाचं उदाहरण दिलं आहे.

“हा तर निवडणूक आयोगाचा निकाल आहे. त्याचा निकाल लागल्यानंतर चर्चा काही करता येत नाही. त्याने फार काही होत नसतं. मला आठवतं काँग्रेसमध्ये एकदा इंदिरा गांधी आणि इतर हा वाद झाला. त्यावेळी काँग्रेसची बैलजोडी खूण होती. पण ती बैलजोडी निवडणूक आयोगाच्या निकालाने गेली. पण काँग्रेसने त्यावेळी हात चिन्ह घेतलं. ते चिन्ह लोकांनी मान्य केलं. त्यामुळे त्याचा फार काही फरक पडत नाही. तसंच शिवसेनेच्या बाबतीत लोकं नवं चिन्ह मान्य करतील. ही चर्चा महिनाभर चालेल”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

'तसं एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', पराबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसं एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', पराबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार.
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्...
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्....
प्रशांत कोरटकर न्यायालयाबाहेर येताच शिवप्रेमी आक्रमक
प्रशांत कोरटकर न्यायालयाबाहेर येताच शिवप्रेमी आक्रमक.
औरंगजेबने संभाजींना मनुस्मृतीप्रमाणे.., काँग्रेस नेत्याचा खळबळजनक आरोप
औरंगजेबने संभाजींना मनुस्मृतीप्रमाणे.., काँग्रेस नेत्याचा खळबळजनक आरोप.
धक्कादायक! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडले 6 ते 7 अर्भकं
धक्कादायक! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडले 6 ते 7 अर्भकं.
दिशा सालियन प्रकणात ठाकरे फसणार? अ‍ॅड. ओझांनी आरोपींची नावंच सांगितली
दिशा सालियन प्रकणात ठाकरे फसणार? अ‍ॅड. ओझांनी आरोपींची नावंच सांगितली.