शिंदे गटाचा व्हीप आम्हाला लागू होणार नाही; उद्धव ठाकरे यांनी ठणकावले
ज्या घटना घडत आहे, त्या जनता प्रामाणिकपणे बघत असते. लोकशाहीचं वस्त्रहरण झालं तर लोक पाहत असतात असं उद्धव ठाकरे म्हणाले आहे. याशिवाय 48 जागा निवडून आल्या तर शाह यांना शुभेच्छाही ठाकरे यांनी दिल्या आहे.
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी शिंदे गटाचा व्हीप ( Shivsena whip ) आम्हाला लागू होणार नाही असे स्पष्ट म्हटले आहे. शिंदे गटाला एक प्रकारे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले त्यामागील कारण देखील सांगितले आहे. याशिवाय निवडणूक आयोगाने सुरुवातीलाच दोन गट असल्याचे मान्य केले होते. असं सांगत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल करत शिंदे गटाला सुनावलं आहे. याशिवाय लोकशाहीचे वस्रहरण होत आहे आणि हे जनता पाहत असल्याचा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
ज्या घटना घडत आहे त्या जनता प्रामाणिकपणे बघत असते. लोकशाहीचं वस्त्रहरण झालं तर लोक पाहत असतात असं उद्धव ठाकरे म्हणाले आहे. याशिवाय 48 जागा निवडून आल्या तर शाह यांना शुभेच्छा असल्याचे ठाकरे म्हणाले आहे.
शिंदे गटाचा व्हीप ठाकरे गटाला लागू होईल का अशी चर्चा सुरू असतांना त्यांचा व्हीप लागू होणार नाही. वाद सुरू झाला. तेव्हा आयोगाने दोन गट मान्य केले. त्यांना चिन्ह आणि नाव दिले आहेत. त्यामुळे व्हीप लागू होणार नाही असा दावा ठाकरे यांनी केलाय.
जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात फैसला होत नाही तोपर्यंत निर्णय घेऊ नये असं आमचं म्हणणं होतं. आम्ही जिथे आहोत तिथेच आहोत. ते घराच्या बाहेर गेले आहेत. ते डिस्क्वॉलिफाय होण्याची शक्यता अधिक आहे. आम्हाला काही भीती नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले आहे.
याशिवाय युतीवरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. 2014 ला युती मी नाही तोडली. त्यांनी तोडली. 2019ला अडीच अडीच वर्षाचा करार झाला. त्यानुसार झालं असतं तर आज हे सन्मानाने घडलं असतं. आम्ही दगा दिला नाही. त्यांनीच दगा दिला आहे असा खुलासाही उद्धव ठाकरे यांनी केलाय.
प्रॉपर्टी आणि इतर मालमत्तांवर हक्क सांगितला तर आम्ही निवडणूक आयोगावर केस दाखल करू असा इशारा देत थेट निवडणूक आयोगाला आव्हान दिलं आहे. याशिवाय मोदी शहा यांना आम्ही जपलं. भाजपला जपलं. त्यांचे मुखवटे काय आहे हे तर कळलं असा टोलाही लगावला आहे.
महापालिका आहे कुठे ती विसर्जित झाली आहे. आज नगरसेवक आहेच नाही. तर कोणत्या आधारे पक्षाचं कार्यालय देणार. पालिकेचं कार्यालय दिलं तर गुन्हा दाखल होईल असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.