“तुम्ही राज्य कारभार करण्याच्या लायकीचे नाही”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

गाडीखाली कुत्र जरी आले तरी राजीनामा मागतील. तुम्ही लोकांची तुलना कुत्र्याशी करता. तुम्ही राज्य कारभार करण्याच्या लायकीचे नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

तुम्ही राज्य कारभार करण्याच्या लायकीचे नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Oct 13, 2024 | 2:12 PM

Uddhav Thackeray Press Conference : “मुंबईला दोन पोलीस कमिशनर आहे. अजून पाच वाढवा. जे लाडके असतील त्यांना कमिशनर करा. पण कारभाराचं काय? महिला असुरक्षित आहे. राजकारणी असुरक्षित आहे. सामान्य जनतेचं काय? गद्दारांच्या कुटुंबीयांना जी सुरक्षा दिली ती काढून जनतेला का देत नाही”, अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर ताशेरे ओढले. महाविकासआघाडीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेवेळी ते बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नुकतीच एक महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेवेळी नाना पटोले, शरद पवार, उद्धव ठाकरे यांसह महाविकासआघाडीतील अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार निशाणा साधला. “आम्ही आरोपपत्र जनतेच्या न्यायालयात मांडत आहोत. जनता न्याय निवाडा करेल याची खात्री आहे. आम्ही राज्याला कुणाचाही गुलाम होऊ देणार नाही”, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

“काल दसरा मेळावा झाला. त्यात मी बोललोच आहे. बोलायचं तरी किती हा एक प्रश्न आहे. गद्दारांचा पंचनामा. गद्दारी केवळ शिवसेना किंवा राष्ट्रवादीशी केली असं नाही. महाराष्ट्राशी गद्दारी झाली असं नाही. मोदी शाह यांची गुलाम झाली आहे. अशा पद्धतीने सरकार चाललं आहे. हे सरकार घालवलं पाहिजे. महिन्या दीड महिन्यात घालवलं पाहिजे. काल जी हत्या झाली, बाबा सिद्दीकीची. मुंबईला दोन पोलीस कमिशनर आहे. अजून पाच वाढवा. जे लाडके असतील त्यांना कमिशनर करा. पण कारभाराचं काय?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

तुम्ही राज्य कारभार करण्याच्या लायकीचे नाही

“महिला असुरक्षित आहे. राजकारणी असुरक्षित आहे. सामान्य जनतेचं काय. गद्दारांच्या कुटुंबीयांना जी सुरक्षा दिली ती काढून जनतेला का देत नाही. घरात धुणी भांडी करणाऱ्यांनाही सुरक्षा दिली असेल. राज्यात हत्या होत असतील. अत्याचार होत असतील. शेवटी कोणी काय करायचं हे सरकार आपल्या अंगाला काही लागूदेत नाही. काही महिन्यापूर्वी अभिषेक घोसाळकरची हत्या झाली. ही जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे. ते होर्डिंग लावतात, पण कारभाराची जबाबदारी घेत नाही. तेव्हा फडणवीस म्हणाले गाडीखाली कुत्र जरी आले तरी राजीनामा मागतील. तुम्ही लोकांची तुलना कुत्र्याशी करता. तुम्ही राज्य कारभार करण्याच्या लायकीचे नाही”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“जनता न्याय निवाडा करेल याची खात्री”

“केवळ जाहिराती सुरू आहे. सिने तारकांना घेऊन जाहिरात करत आहेत. जाहिरात करणारे आणि स्वतचा अनुभव घेऊन तपासणारे लोक एकच आहे. अनेक प्रश्न आहे. आम्ही ते प्रश्न निवडणुकीच्या तपासावेळी मांडूच. आरोपपत्र निष्क्रिय सरकारबद्दल, आम्ही आरोपपत्र जनतेच्या न्यायालयात मांडत आहोत. जनता न्याय निवाडा करेल याची खात्री आहे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.

“आम्ही राज्याला कुणाचाही गुलाम होऊ देणार नाही. आम्ही शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, मोदी शहा यांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही. निर्णयाची उधळपट्टी सुरू आहे. अंमलबजावणी कशी करायची याला काहीच बंधन नाही. जनतेने या सरकारला आता घरी पाठवावं ही अपेक्षा आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.
भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; हत्येची जबाबदारी गृहमंत्र्यांची नाही तर…
भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; हत्येची जबाबदारी गृहमंत्र्यांची नाही तर….