शिंदे-फडणवीस यांच्या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, दोनच शब्दात वर्णन!

अर्थसंकल्पावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, यापूर्वीचे 2-3 अर्थसंकल्प मविआ सरकारने मांडले होते. ते अभ्यासपूर्ण होते. मात्र आज सरकारने...

शिंदे-फडणवीस यांच्या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, दोनच शब्दात वर्णन!
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 4:11 PM

मुंबई : महाविकास (Mahavikas Aghadi) आघाडी सरकार उलथवून टाकल्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने 2023-24 या वर्षासाठीचा पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget) मांडला. राज्यातील शेतकरी, महिला, तरुण, युवा, विद्यार्थी, नोकरदार यांच्यासाठी राज्य सरकारने भरीव तरतूद आणि योजना जाहीर केल्या. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे. हा चुनावी जुमला आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. तर उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर निशाणा साधला. विधानसभेत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर विधान परिषदेत दीपक केसरकर यांनी अर्थसंकल्प मांडला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी याचं वर्णन गाजर हलवा अर्थसंकल्प आहे, अशा शब्दात वर्णन केलं.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

अर्थसंकल्पावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, यापूर्वीचे 2-3 अर्थसंकल्प मविआ सरकारने मांडले होते. ते अभ्यासपूर्ण होते. मात्र आज सरकारने केवळ घोषणांचा पाऊस पाडला आहे. सर्व घटकांना मधाचं बोट लावल्याचा प्रयत्न झाला. अवकाळी पाऊस झाला तसा मुंबईत गडगडाटही झाला. गरजेल तो बरसेल काय, असा अर्थसंकल्प आहे. गाजर हलवा अशा प्रकारचा आहे. आमच्या योजनांचं नामांतर करून योजना मांडल्या आहेत. जी योजना आम्ही मुंबईत सुरु केली- बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना राज्यभर राबवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मदत वाढवली. पण हमखास भावाची वाच्यता नाही. केसरकरांनी अर्थसंकल्पात पंतप्रधानांचा उल्लेख केला. मोदींनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल, अशी घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात वास्तव काही वेगळं आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

अजित पवार काय म्हणाले?

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अर्थसंकल्पावर सणकून टीका केली. ते म्हणाले, स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे, घोषणांचा सुकाळ असलेला हा अर्थसंकल्प आहे. राज्याचं एकंदरीत परिस्थिती, उत्पन्न, खर्च पाहून या घोषणा करण्यात आलेल्या नाहीत. आर्थिक पाहणी अहवालात राज्याची अर्थव्यवस्था भारताच्या तुलनेत कमी दराने वाढत आहेत. आज आपण सगळ्यांनी आकडे ऐकले. घोषणा पाहिल्या. आम्ही अर्थसंकल्पावर दोन दिवसात सविस्तर भूमिका मांडणार आहोत. राज्याला कर्जबाजारी करण्याकडे वाटचाल सुरु आहे. राज्याचं वास्तवचित्र सांगायला अर्थमंत्री तयार नाहीत.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.