ठाकरे म्हणाले आता ही शेवटची लढाई… ती जिंकलो की आपण सगळं मिळवलं…हा निखाऱ्यावरचा प्रवास

आता ही शेवटची लढाई आहे, ती जिंकलो की आपण सगळं मिळवलं असे म्हणत हा निखाऱ्यावरचा प्रवास असून तुम्ही सोबत आहात ना ? असा सवाल विचारात ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना विश्वासात घेतले असून पुढील लढाई जिंकण्याचा विश्वास दिला आहे

ठाकरे म्हणाले आता ही शेवटची लढाई... ती जिंकलो की आपण सगळं मिळवलं...हा निखाऱ्यावरचा प्रवास
Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 09, 2022 | 3:58 PM

दिनेश दुखंडे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह काही काळासाठी गोठवले गेल्याने शिंदे (Eknath Shinde) आणि ठाकरे  (Uddhav Thackeray) दोन्ही गटाकडून मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. एकीकडे नवे चिन्ह मिळवण्यासाठी धडपड केली जात असतांना पदाढीकाऱ्यांशी संवाद साधण्याचे काम दोन्ही गटाकडून केले जात आहे. अशातच ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला आहे. या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. नोटबंदीनंतर नरेंद्र मोदी हे घासलेलं-संपलेललं नाणं असल्याचे म्हणत आपल्या कडे बाळासाहेबांसारखे खणखणीत नाणं असल्याचे म्हंटल आहे. दसरा मेळाव्यातील भाषणानंतर उद्धव ठाकरे यांनी थेट मोदींवरच टीका करण्याची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. याशिवाय ठाकरे यांनी शिंदे गटात गेलेल्या खासदारांना देखील आव्हान दिलं आहे.

राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधत आपली शेवटची लढाई असल्याचे म्हंटले आहे.

आता ही शेवटची लढाई आहे, ती जिंकलो की आपण सगळं मिळवलं असे म्हणत हा निखाऱ्यावरचा प्रवास असून तुम्ही सोबत आहात ना ?

हे सुद्धा वाचा

असा सवाल विचारात ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना विश्वासात घेतले असून पुढील लढाई जिंकण्याचा विश्वास दिला आहे.

यावेळी बोलतांना मी भाजपशी लढलो, कुटुंबातील लोकांशी लढलो. ही लढाई लढून मी आपल्या पक्षाचे 63 आमदार निवडून आणले याचा आवर्जून उल्लेख ठाकरे यांनी व्हीसीमध्ये केला.

दरम्यान आपल्याकडून फुटण्याआधी खासदार मला म्हणत होते की पुढल्या निवडणुकीत मोदी यांच्या नावाचा आपल्याला वापर करावा लागेल.

मग माझा त्यांना सवाल आहे की आमच्यातुन फुटल्यानंतर त्यांच्या गटाला बाळासाहेबांच्या नावाची गरज का लागते ? असा प्रश्न उपस्थित करून ठाकरेंनी निशाणा साधला आहे.

नव्या चिन्हाबाबत दुसरीकडे प्रयत्न केले जात असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची एकजूट कायम टिकवून ठेवण्यासाठी ठाकरे गट प्रयत्न करतांना दिसून येत आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.