मी तर लढाईचीच वाट बघतोय…भुजबळांच्या व्यासपीठावरुन उद्धव ठाकरेचं खुलं आव्हान…
मी लढाईच्याच क्षणाची वाट पाहतोय असे म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर नाव न घेता खुलं चॅलेंज दिले आहे.
मुंबई : ही लढाई काही आम्ही काय सोडणार नाही…अनेक वादळं आली पण अनेक वादळं सोबत होती, आणि तुम्ही सर्वजण सोबत असल्यावर मी लढाईच्याच क्षणाची वाट पाहतोय असे म्हणत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) विरोधकांवर नाव न घेता खुलं चॅलेंज दिले आहे. उद्धव ठाकरे हे विधान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित अमृत महोत्सव सोहळ्यात केले आहे. भुजबळांना शुभेच्छा देत असतांना भुजबळांच्या वादळाने आमच्या कुटुंबाला मानसिक त्रास दिला होता असाही उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केलाय. कुटुंबातील माणूस सोडून जाउच कसा शकतो ? असे बाळासाहेबांसहित सर्वांना वाटलं होतं असे म्हणताच भुजबळ भावुक झाले होते. मात्र, याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी अशी अनेक वादळे सोबत असतांना आता मी लढाईचीच वाट बघतोय असे म्हंटले आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी भुजबळ गेले पण सर्व राष्ट्रवादी सोबत घेऊन आले आणि शिवाय कॉँग्रेसला सुद्धा बरोबर घेऊन आले असे म्हंटले आहे.
उद्धव ठाकरे भुजबळांच्या अमृत महोत्सव सोहळ्याला उपस्थित असतांना जम्मू काश्मीरचे फारूक अब्दूला हे देखील उपस्थित होते.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले वयाचे आणि महाराष्ट्राचे अंतर जास्त असल्याने अब्दूला यांची भेट होत नाही पण ते बाळसाहेबांचे चांगले मित्र होते.
पण ते मला आत्ता भेटले तेव्हा म्हणाले, अजिबात घाबरू नकोस, लढ वडिलांसारखा लढ, ही लढाई आम्ही सोडणार असाही पुनरुच्चार ठाकरेंनी केला.
राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस यांच्यातील वादळे बरोबर असल्यावर लढाई लढणारच, याशिवाय शरद पवार साहेबांसारखे वादळ असो आणि पाऊस असो न डगमगनारे सोबत आहे.
याशिवाय तुम्ही सर्व जण सोबत असल्यावर मी लढाईचीच वाट बघतोय असे म्हणत येणाऱ्या निवडणुकीत उद्धव ठाकरे संपूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे एकप्रकारे संदेश दिला आहे.