शिवसेनेमुळे मराठी माणूस मुंबईत टिकला, तसं मुंबईची वाट देखील शिवसेनेनेच लावली, कोणी केला धक्कादायक आरोप
आम्ही आमचा मुद्दा हिंदुत्व आणि मराठीबाणा कधी सोडला नाही. मात्र लोकसभेला याच्या तोंडाला रक्त लागलेला आहे. त्यामुळे अब्बू आझमीसारखे अनेक लोक ते जवळ करीत आहेत. याचे परिणाम भविष्यात चांगले होणार नाहीत अशी टिका देखील या नेत्याने केली आहे.
लोकसभा आणि पदवीधर निवडणुकीत मनसेला युतीने विनंती केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मनसेला विचारलं नाही. एका मताने कोणाला फरक पडतो. कोणाला नाही पडत. मात्र राज ठाकरे जिरवायची म्हणून असं राजकारण करीत नाहीत. ते मैत्रीला जागणारे आहेत.लोकसभेत धनंजय महाडिक यांना मनसेचे महत्त्वाचं मते पडलं. शिवसेना ठाकरे गटाला जर गरज होती तर त्यांनी का विचारलं नाही ? असा सवाल मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी केला आहे. आमचा पक्ष कसा टिकवायचा.. कसा चालवायचा हे आम्हाला सांगायची गरज नाही राज ठाकरे हे सक्षम आहेत असाही टोला त्यांनी लगावला. 2006 पासून कुठलाच पक्ष टिकून राहिलेला नाही. सत्ताकारण, पैसेकारण आणि राजकारण यामध्ये पक्ष टिकून राहणं हे महत्त्वाचं आहे. यासाठी कधी कधी काही काही निर्णय घ्यावे लागतात. विधानसभेत ठाकरेंना मदत लागली तर त्यांनी शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्याकडे जायला हवे. काय करायचं राज ठाकरे बघून घेतील असेही राजू पाटील यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांनी अबू आझमीचे मातोश्रीवर स्वागत केले आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी टीका करीत अबू आझमीचं मातोश्रीमध्ये बाळासाहेबांच्या फोटोस समोर स्वागत केल्यावर त्यांच्याकडून आम्ही काय अपेक्षा ठेवायची ? असा सवाल राजू पाटील यांनी केला आहे. यांना फक्त खुर्च्या दिसतात. महाराष्ट्र द्वेषी अबू आझमी याचा बाळासाहेबांच्या फोटोसमोर स्वागत करतात या गोष्टीची त्यांना लाज वाटली पाहिजे होती. त्यांच्यावर कोणी बोलत नाही. त्यामुळे ते कसाही आपला पक्ष टिकवायचा आणि आम्ही थोडं मदत केली तर आम्हाला जाब विचारायचा असा त्यांच्या खाक्या राहीला आहे. आम्ही आमचा मुद्दा हिंदुत्व आणि मराठीबाणा कधी सोडला नाही आणि कधी सोडणारही नाही.लोकसभेत यांच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे, त्यामुळे ते अबू आझमींसारखे अनेक लोक जवळ करीत आहेत याचे परिणाम भविष्यात चांगले होणार नाहीत.लोकांनी रागामध्ये भाजप विरोधात मतदान केलेले आहे मात्र काही जागेवरती पाच -पाच विधानसभेत लोक यांच्या विरोधात होती. मालेगावमध्ये देखील असेच झाले. तुम्ही अशा प्रकारे पक्ष चालवत असाल तर राज ठाकरे ज्या पद्धतीने पक्ष चालवतात त्यात आम्ही समाधानी असल्याचे मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटले आहे.
त्यांना गरज असेल तर शिवतीर्थावर जावे
लोकसभेत आणि पदवीधर निवडणुकीत मनसेला युती कडून विनंती केली उद्धव ठाकरे यांनी विचारलं नाही एका मताने कोणाला फरक पडतो नाही पडत… मात्र राज ठाकरे जिरवायची म्हणून असं करत नाही ते मैत्रीला जागणारे धनंजय महाडिक यांना लोकसभेत मनसेचे मत महत्त्वाचं पडलं शिवसेना ठाकरे गटाला जर गरज होती तर त्यांनी का विचारलं नाही ?….आमचा पक्ष कसा टिकवायचा कसा चालवायचा हे आम्हाला सांगायची गरज नाही राज ठाकरे हे सक्षम आहेत…. 2006 पासून कुठल्याच पक्ष टिकून राहिला नाही सत्ता कारण पैसे कारण आणि राजकारण यामध्ये पक्ष टिकून राहणं हे महत्त्वाचं यासाठी कधी कधी काही काही निर्णय घ्यावे लागतात…..विधानसभेत ठाकरेंना मदत लागली तर त्यांनी शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्याकडे जायला हवे काय करायचं राज ठाकरे हे बघून घेतील
मुंबईची वाट शिवसेनेने लावली
मुंबईत मराठी माणसाला घर दिले जात नाही. यावर बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी आधी मुंबई गर्दी नव्हती, मात्र शिवसेनेचे राज्य आले आणि 40 लाख मोफत घरे देण्याची घोषणा झाली. त्यावेळेला लोकांची मानसिकता बनली की मुंबईत फुटपाथ वर झोपडं बांधलं की नवीन घर मिळतं. या चुकीच्या धोरणामुळे मुंबईची दुर्दशा झाल्याचा आरोप राजू पाटील यांनी केला आहे. शिवसेनेमुळे मराठी माणूस मुंबईत टिकला तसे मुंबईची वाट देखील शिवसेनेने लावली असा आरोप देखील मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेना नेतेत उद्धव ठाकरे यांच्यावर केला. डोंबिवलीमध्ये निर्भय जर्नालिस्ट असोसिएशनच्या कार्यक्रमात ते बोलत होते.