देवेंद्रजी, जनाची नाही तर मनाची ठेवा… उद्धव ठाकरे खवळले; ‘त्या’ मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल

रोज पेपर बघतोय कधी नव्हे ते दिल्लीवाले इकडे येत आहेत. त्यांना परत पाठवायचं. आपल्याकडे घ्यायचं नाही. यापूर्वी आपल्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी होते. तेव्हा आपण मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून फिरत होतो. आता हेच लोक आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्या आमचं इंडिया आघाडीच सरकार आल्यानंतर गुजरातच्या हक्काचं नक्की देऊ. आम्ही मोदीजी यांना गुजरातला पाठवल्या शिवाय राहणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

देवेंद्रजी, जनाची नाही तर मनाची ठेवा... उद्धव ठाकरे खवळले; 'त्या' मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 20, 2024 | 9:01 PM

सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले आहेत. त्यामुळेच ते काहीही आरोप करत आहेत. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून मी दिल्लीत जाणार असं मी कधीच बोललो नव्हतो, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीस यांच्या या दाव्याचा उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. देवेंद्र फडणवीस जरा जनाची नाही तर मनाची तरी बाळगा. ती कुठली तरी खोली नव्हती. ती बाळासाहेबांची खोली होती. त्याच खोलीबाहेर तुम्हाला अमित शाहने उभं केलं होतं, असा घणाघाती हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज अँटॉप हिल येथे जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल देसाई उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे राहुल शेवाळे आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यात थेट लढत आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी हा हल्लाबोल केला.

आदित्यला मुख्यमंत्री करतो

मी मुलाखत दिली होती. त्यात बाळासाहेबांच्या खोलीत बसून बोलणं झालं होतं असं म्हटलं होतं. मी देवदेवतांची शपथ घेऊन बोललो. यांनी 2014 ला आणि 2019 आपला विश्वास घात केला. आदित्य ठाकरेंना मी तयार करतो. त्यानंतर आपण त्याला मुख्यमंत्री करू असं मला फडणवीस म्हणाले होते. मी म्हटलं अहो असं करू नका. आधी त्याला आमदार करू. मी त्यांना म्हटलं अहो असं नको. त्यावर फडणवीस म्हणाले मी वरती जाणार आहे. म्हणजे केंद्रात जाणार आहे. त्यामुळे आदित्यला तयार करून मुख्यमंत्री करू, असं फडणवीस म्हटल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

ती बाळासाहेबांची खोली होती

उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले असल्याचं आज म्हणत आहेत. अहो देवेंद्रजी जनाची नाही तर मनाची तरी ठेवा. म्हणाले, कोणत्या तरी खोलीत घेऊन गेले. देवेंद्रजी ती कुठली तरी खोली नव्हती. ती बाळासाहेबांची खोली होती. ज्या खोलीबाहेर अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना बाहेर थांबायला सांगितलं होतं, असा हल्लाबोल त्यांनी केला.

सरकार आल्यावर ईडी, सीबीआय आपलीच

आजची सभा प्रचारासाठी नाही, तर विजयासाठी आहे. लढत कुणामध्ये होणार हे सांगायचं तर ज्याने आपल्या आईवर वार केले त्याच्याशी आहे. जो आपल्या आईचा होऊ शकला नाही, तो तुमचा काय होणार? त्याने आता काहीही देऊ द्या. श्रीखंड देईल, दूध देईल, त्याने काहीही देऊ द्या. आपलं सरकार आल्यावर ईडी, सीबीआय आपलंच आहे, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी राहुल शेवाळे यांना नाव न घेता दिला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.