दुष्काळ ते राफेल, उद्धव ठाकरेंची मोदींवर चौफेर टीका

पंढरपूर : विठुरायाच्या पंढरीतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी संकेत दिले आहेत. शेतकरी प्रश्न, राफेल व्यवहार, राम मंदिर, या सर्व मुद्द्यांवरुन उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शिवाय जानेवारीमध्ये दुष्काळी भागाचा दौरा करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलंय. आरक्षणप्रश्नी धनगर समाजासोबत शिवसेना खांद्याला खांदा लावून उभी असल्याचं त्यांनी आश्वासन दिलं. “कुंभकर्ण जागा […]

दुष्काळ ते राफेल, उद्धव ठाकरेंची मोदींवर चौफेर टीका
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

पंढरपूर : विठुरायाच्या पंढरीतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी संकेत दिले आहेत. शेतकरी प्रश्न, राफेल व्यवहार, राम मंदिर, या सर्व मुद्द्यांवरुन उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शिवाय जानेवारीमध्ये दुष्काळी भागाचा दौरा करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलंय. आरक्षणप्रश्नी धनगर समाजासोबत शिवसेना खांद्याला खांदा लावून उभी असल्याचं त्यांनी आश्वासन दिलं.

“कुंभकर्ण जागा कधी होणार”

राम मंदिर प्रश्नावरुन उद्धव ठाकरेंनी सरकारला पुन्हा खडेबोल सुनावले. राम मंदिर कधी दिसेल. बाबरी पाडून घेतली, बाबरीच्या मुद्दावरून गादी बळकावलीत आणि त्यावर कुंभकर्णासारखे लोळताय? सोहराबुद्दीन खटल्यातील सगळे निर्दोष मुक्त झाले, मात्र बाबरी पाडणाऱ्यांविरोधातील खटले अजून सुरू आहेत. 30 वर्ष होत आली, आता तुम्ही सांगता की न्यायालयात हा मुद्दा आला आहे. हिंदू भोळा आहे, मात्र तो बावळट नाही. राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्दावर संसदेत चर्चा होऊन जाऊ दे, एनडीएतील किती पक्ष विरोधात आहे आणि किती समर्थनात आहे हे कळेल, असं खुलं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं.

“बिहारमधील फॉर्म्युल्याचं अभिनंदन”

दरम्यान, बिहारमध्ये भाजपने नमतं घेतल्याने शिवसेनेच्या चेहऱ्यावरचं हास्य लपू शकलं नाही. यावरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. राम मंदिराबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि रामविलास पासवान यांचे मत काय आहे? जे नितीश भाजपमुक्त भारत करायला निघाले होते, त्यांच्या मांडीला मांडी लावून भाजप बसलंय. नितीश कुमार आणि रामविलास यांच्यापुढे भाजपने नमतं घेतलं, चांगली गोष्ट आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

राफेल मुद्द्यावरुन टीका

राफेल विमान खरेदीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने सरकारला क्लीनचिट दिली असली तरीही उद्धव ठाकरेंनी मात्र याप्रकरणी पुन्हा एकदा सरकारला घेरलंय. सैनिकांच्या शस्त्रखरेदीत घोटाळा करता, मग सैनिकांचं वेतन वाढवण्यासाठी का मागेपुढे पाहता? असा सवाल त्यांनी केला.

शिवाय पीकविमा योजनेत घोटाळा झाला असल्याचं पी. साईनाथ यांनी म्हटलंय. राफेलमध्ये जे झालं, तेच पीकविमा योजनेत झालंय. अनुभव नसलेल्या कंपन्यांकडे काम देण्यात आलं, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.