‘भाजपला राजकारणात पोरं होत नाही त्यात माझा काय दोष’, उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे, ते चाळीसगावमध्ये बोलत होते.

'भाजपला राजकारणात पोरं होत नाही त्यात माझा काय दोष', उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
Follow us
| Updated on: Nov 11, 2024 | 9:21 PM

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा महायुती सरकार आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ते चाळीसगावमध्ये बोलत होते. मी म्हणजे भाजपा नाही, वापरा आणि फेकून द्या. 5 वर्षापूर्वी मला नाईलाईजानं मुख्यमंत्री व्हावं लागलं. मी कलाकार माणूस. फोटोग्राफी करतो. मी आज फोटोग्राफी केली. पहिल्या सभेला उतरलो हेलिकॉप्टरजवळच 5-6 जण उभे होतो.  मी त्यांना विचारलं तर म्हणाले तुमची बॅग चेक करायची आहे.  मी म्हणालो जरुर तपासा. जशी माझी बँग तपासली तशी पंतप्रधान मोदी, शहांची, शिंदेंची तपासणार का? जो कायदा मला आहे तोच भाजपच्या लोकांना आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान प्रचाराला आले तरी कायदा समान पाहिजे. तुम्ही जेव्हा शपथ घेता तेव्हा, भाजपचे नाही तर देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेता,  भाजपचे म्हणून असाल तर गुजरातच्या भाजप ऑफीसमध्येच बसा, माझी बॅग रोज तपासा किंवा बॅग तुम्हीच घेऊन चला. माझ्याप्रमाणेच मोदी, शहा, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची बॅग तपासली पाहिजे. ते येताना त्यांच्या बॅगा तपासाच मात्र जाताना देखील आवश्य तपासा. कारण महाराष्ट्र लुटला जात आहे. सिंचनाचे प्रकल्प अनेक वर्ष तेच आहेत,  भाजपचे खासदार त्रिफळाचित झाले आहेत.  इकडे निवडूण आले, आपण एकता दाखवली असती तर निवडूण आले नसते असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

यांच्या वडिलांचं काय जातं घराणेशाही म्हणायला, पण वारसा संभाळणं ही साधी गोष्ट नाही. भाजपला राजकारणात पोरं होत नाही त्यात माझा काय दोष. ईडी इन्कम टॅक्स मागे लावता.  3 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बदलले,  चंद्रचुड तर उत्तम भाषणकार ज्यांना भाषणकार पाहिजे त्यांनी घेऊन जा. आत्ताच्या नवीन न्यायाधीशांना माझी विनंती आहे, लवकरात लवकर निर्णय घ्या, ज्यामुळे लोकशाही जिवंत राहील, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.