मुंबई | 24 ऑक्टोंबर 2023 : आपली परंपरा आपण चालू ठेवली आहे. पुढची अनेक वर्ष ही अशीच चालू ठेवणार आहोत. सर्वप्रथम दसऱ्याच्या मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आज दसरा आहे. शस्त्रपूजन आहे, सरस्वती पूजन आहे. हा मेळावा त्या संस्कृतीचे एक विराट दर्शन आहे. रामाने रावणाचा वध केला. कशासाठी केला? कारण असं ऐकलं आहे, एवढा शिवभक्त असूनसुद्धा रामाला त्याला मारावे लागलं. कारण, रावण माजला होता. रावणाने सीतेला पळवलं होतं. त्याचप्रमाणे आज सुद्धा आपली शिवसेना पळवण्याचा प्रयत्न होतोय. आपण खबरदारी घेतली आहे. त्यांनी रावणाचा वध केला होता भानगड नको म्हणून. तो धनुष्यबाण सुद्धा चोरला आहे. पण एक लक्षात घ्या की ज्याप्रमाणे हनुमानाने रावणाची सोन्याची लंका दहन केली होती तशीच तुमची खोक्याची लंका दहन करणार असा इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.
शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. मी गद्दारांवर जास्त बोलणार नाही. पण, त्यांच्यावर बोलण्याची आता गरज नाही. कारण तुम्ही सगळेजण बोलत आहात. सध्या क्रिकेटचा मौसम आहे. काही जाहिरातीमध्ये तीन हिरो दाखवतात. अजय देवगन, अक्षय कुमार आणि शाहरुख येतात. दोन दोन बोट दाखवतात. आमच्याकडे काही बसले आहेत. आमच्याकडे सुद्धा दोन दोन हाफ आहेत. एक कमला आणि दुसरा तुम्हाला माहित आहे असा टोला ठाकरे यांनी लगावला.
संसदेचे अधिवेशन झाले. संसदेला तो अधिकार आहे. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. ज्याप्रमाणे दिल्लीचा निर्णय घेतला. संपूर्ण बदल्याचे अधिकार हा कोर्टाने दिलेला निर्णय आहे. पाशवी बहुमताच्या जोरावर तो तुम्ही हिरावून घेतला. भाजप एवढा विघ्न संतोषी आहे की कोणाचे लग्न असो तुम्ही बोलवण पाठवू नका. पण, हे जाणार, बसणार, भरपूर जेवणार. श्रीखंड पुरी असेल, बासुंदी असेल. किती पोळ्या खाणार याच्या स्पर्धा लावतील. खाऊन खाणार तरी किती? पण, निघताना नवरा बायकोमध्ये भांडण लावून निघणार अशी याची नीती आहे अशी जळजळीत टीका त्यांनी भाजपवर केली.
तुमच्या घरी चोरी करतो. तुमची घरदार आणि पेटवतो आणि पुन्हा तुमचे रक्षण करते म्हणून सांगणार. तुमच्या घरांच्या होळीवर आम्ही आमची पोळी भाजणार. आपण सुप्रीम कोर्टात गेलो. तारीखवर तारीख मिळते. सर्वोच्च न्यायालय सांगत की टाईम टेबल सादर करा. अध्यक्ष सांगतात आमच्या वेळेनुसार देऊ. मी कोणाचाही अपमान करू इच्छित नाही. पण ज्या पद्धतीने सगळं चाललेलं आहे ते बघितल्यानंतर एक विनोद लक्षात येतो.
कोर्टात केस चालू असते. कोर्ट विचारते पुढची केस कोणती? एका वीस वर्षाच्या मुलीची झेड काढलेल्या प्रक्रांची केस सुरु असते. एक आजोबा असतात. कोर्ट त्यांना विचारते, तुम्हाला लाज नाही वाटत? वीस वर्षाच्या मुलीची छेड काढता? आजोबा म्हणतात, न्यायाधीश महाराज जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी सुद्धा वीस वर्षाचा होतो. वीस वर्षाचा असताना ती घटना घडली. आता ते आजोबा झाले. जिची छेड काढली होती त्याही आजी झाल्या. सध्या तेच सुरु आहे. भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय म्हणून जे काही आहे त्याला हा लवाद जुमानत नसेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या अस्तित्व राहणार आहे की नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना हिचे अस्तित्व शिल्लक राहणार आहे की नाही? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक क्रांतिकारक आणि अनेक योध्यांनी रक्त सांडून बलिदान देऊन त्या करून जे आपले भारत माता स्वतंत्र जाणार आहे की नाही असा सवाल त्यांनी केला.