डाळीपासून साखरेपर्यंत पाच वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार, पण… उद्धव ठाकरे यांची कोल्हापुरातून मोठी घोषणा

उद्धव ठाकरे यांनी आपल्या पहिल्याच सभेमधून शिंदे, फडणवीस पवार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महागाई आणि लाडकी बहीण योजनेवरून जोरदार निशाणा साधला.

डाळीपासून साखरेपर्यंत पाच वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार, पण... उद्धव ठाकरे यांची कोल्हापुरातून मोठी घोषणा
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 2:35 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. प्रचाराचा धुराळा उडाला असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली सभा कोल्हापुरात पार पडली या सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.  आज जे काही बघतो आहोत, मी इथे नन्नाचा पाढा लावायला आलो नाही. पण अडीच वर्ष भोगत आलो ते व्यक्त करायला आलोय. खोके सरकार आहे. जिथे मिळेल तिथे खात आहे. रस्त्यातही खात आहे. आपलं सरकार असताना पुण्याच्या रिंगरोडची संकल्पना आपली होती. आपण ज्या रकमेला मंजुरी दिली त्यापेक्षा कितीतरी पटीने रक्कम मंजूर केली, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,  मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. त्या पाच वर्षात पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते. महागाई वाढू दिली नव्हती. आमचं सरकार आलं तर पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू, अशी घोषणा करतो. त्यात डाळ, तांदूळ, साखर, तेल आलं जे काही लागते त्याचे भाव स्थिर ठेवून दाखवणारच. सरकारही स्थिर आणि भावही स्थिर ठेवू. नुसतं तुम्ही कोपराला गूळ लावता. लोकांना भरकटून टाकता. महाराष्ट्र गुजरातला विकून टाकायचा. मी काही गुजरातच्या विरोधात नाही. महाराष्ट्रातील हक्काचं, जे आहे तो त्यांच्या तोंडचा घास ओरबाडून गुजरातला देणार असाल तर आम्ही कदापी होऊ देणार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी लडाक्या बहिणीवरून देखील शिंदे सरकारवर घणाघात केला. निवडणूक आल्यावर बहीण दिसते का. बदलापुरात मुलीवर अत्याचार झाल्यावर तिची तक्रार पोलीस घेत नाही. तिच्या आईला कोणत्या तोंडाने लाडकी बहीण म्हणून १५०० रुपये देणार आहात. जाणार तिकडे. देणार त्या मातेला १५०० रुपये. लाडकी बहीण योजनेने घर चालणार असेल असं एकाने जरी सांगितलं तर आम्ही महाविकास आघाडीला सांगू उमेदवार देऊ नका. महिला खूश आहेत. महिलांची सुरक्षितता वाऱ्यावर, राज्य विकायचं, महागाई वाढवली जात आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
माझ्या विरोधात षडयंत्र अन्..., अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे भावूक
माझ्या विरोधात षडयंत्र अन्..., अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे भावूक.
'उठाव केला तेव्हा शंभूराज दोन पाऊलं माझ्या पुढं..', शिंदे म्हणाले...
'उठाव केला तेव्हा शंभूराज दोन पाऊलं माझ्या पुढं..', शिंदे म्हणाले....
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? सभेतून शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? सभेतून शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर.
पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण, 'लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा...'
पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण, 'लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा...'.
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'.
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास..
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास...
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका.
फडणवीसांच्या सभांचा धडाका, महायुतीचं सरकार आणण्यासाठी 6 दिवसात 21 सभा
फडणवीसांच्या सभांचा धडाका, महायुतीचं सरकार आणण्यासाठी 6 दिवसात 21 सभा.
‘शिंदे अन् शरद पवार संपर्कात, 23 नोव्हेंबरनंतर...’, मलिकांचा मोठा दावा
‘शिंदे अन् शरद पवार संपर्कात, 23 नोव्हेंबरनंतर...’, मलिकांचा मोठा दावा.
सरवणकर लढणारच, शेवटच्या क्षणापर्यंत धावाधाव, राज यांच्या घरी काय झालं?
सरवणकर लढणारच, शेवटच्या क्षणापर्यंत धावाधाव, राज यांच्या घरी काय झालं?.