मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदही अडीच अडीच वर्षाचं ठेवणार का?; उद्धव ठाकरेंनी महायुतीला घेरलं

एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेत सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर कोरडे ओढले आहेत

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदही अडीच अडीच वर्षाचं ठेवणार का?; उद्धव ठाकरेंनी महायुतीला घेरलं
Follow us
| Updated on: Dec 17, 2024 | 2:09 PM

राज्यातील नवीन सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार रविवारी नागपूरात राजभवनावर पार पडल्यानंतर आता हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. नागपूरात एकीकडे थंडीत अधिवेशनात गरमागरमी सुरु असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सरकारवर तोफ डागली आहे. उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापन होऊन १२ दिवसांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्‍यांनी शपथ घेतली. आणि आता तर खाते वाटपावरुन यांची खळखळ सुरु असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जर खाते वाटपच झालेले नाही तर अधिवेशन काय टाईमपास म्हणून खेळताय का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

मारकडवाडी येथे झालेल्या दडपशाहीचा उल्लेख करीत त्यांनी ३०० उंबरे असलेल्या गावात ४०० पोलिस आणून ग्रामपंचायतीने घेतलेला अभिरुप बॅलेट निवडणूकीचा निर्णय दडपून टाकल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्ती केली. मतदाराला त्याचे मत नक्की कुठे जातेय हे समजले पाहीजे असेही त्यांनी ठणकावून सांगितले. ते पुढे म्हणाले की निवडणूक आयुक्त निवडून आलेला पाहिजे. तरच त्याला निवडणूक आयुक्त मानलं पाहिजे. मारकवाडी साधं गाव आहे. मग एका गावात मतदान घ्यायला का घाबरता?. ईव्हीएमला जी मते पडली तीच बॅलेट पेपवर येतील ना. लोकशाहीत मी कुणाला मतं देत आहे, ते मला कळलं पाहिजे हे मला कळलं पाहिजे. बॅलेट पेपरवरील मतदान मला कळायचं असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले की लोकशाही किंवा मतदानाची प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे. तोपर्यंत वन नेशन वन इलेक्शन पूर्ण करू नये. महाराष्ट्रात जे घडलं ते कुणालाही पटलेलं नाही. त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन डोक्यावर मारू नये. ४००ची वस्ती असलेल्या मारकडवाडीत ३०० पोलीस आणले अशीही टीका त्यांनी केली आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी इंडिया आघाडीत आम्ही एकमेकांत विसर्जित झालो नाही. त्यांची मते त्यांच्याकडे आमची मते आमच्याकडे आहेत असेही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही अडीच वर्षाने बदलणार का ?

दरवर्षी अनिल परब आणि संजय पोतनीस सुप्रीमो चषक घेतात. तो एकप्रकारचा फिरता चषक असतो. आता मंत्रीपदं फिरते असतील. ज्यांच्या जोरावर झाले ते फिरते. आणि जे झाले ते कायम. मग तु्म्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही अडीच वर्षाने बदलणार का. त्यांना बदलण्याचं ठरलंय का. ते सांगा अशा रोकडा सवालच उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला आहे.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....