उद्धव ठाकरे यांचं थेट मोदींनाच आव्हान… म्हणाले, विधानसभा आलीय, या…

या निवडणुकीत आपले कोण आणि परके कोण दिसलं. काही लोकांनी तर उद्धव ठाकरे नको म्हणून 'बिनशर्ट' पाठिंबा दिला. अरे उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट. उघड पाठिंबा दिला. म्हणजे बिनशर्ट ना. बरोबर की चूक आहे अशा टोमणानी राज ठाकरे यांचे नाव घेता उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.

उद्धव ठाकरे यांचं थेट मोदींनाच आव्हान... म्हणाले, विधानसभा आलीय, या...
उद्धव ठाकरेImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jun 19, 2024 | 9:19 PM

शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्याने दोन्ही शिवसेना गटाचा मुंबईत दोन ठिकाणी स्वतंत्र वर्धापन साजरा करीत आहेत. लोकसभेच्या निवडणूकांत देशात आणि महाराष्ट्रात भाजपाची पिछेहाट झाली आहे. त्यानंतर शिवसेनेच्या वर्धापन दिन साजरा होत असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेला सर्व देशप्रेमींची मते मिळाली आहेत, त्यात मुस्लीम आहेत, ख्रिश्चन आहेत, बौद्ध आहेत दलित आहेत असे मुंबईकर आहेत असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

काही संस्थांनी लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया आघाडीला पाठिंबा जरुर दिला. काही युट्युबरनेही प्रचार केला त्यांचा मी आभार मानतो. परंतू मिंधे बोलले हा शहरी नक्षलवाद आहे. हुकूमशाही तोडाफोडा आणि लोकशाही वाचवा हा प्रचार जर तुम्हाला नक्षलवाद वाटतो. आणि लोकशाही वाचवा हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. पण तुमचे बापजादे दिल्लीत बसले आहेत. मोदी शहा जे सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करत आहे. कार्यकर्त्यांच्या घरी ईडी सीबीआयला पाठवता. अमोलला पाडणारा गद्दार निर्लज्जपणे सांगतो माझ्याकडे पर्यायच नव्हता. नाही तर तुरुंगात गेलो असतो. तुम्ही दमदाट्या देऊन तुरुंगात टाकता, दहशत निर्माण करता हा तुमचा नक्षलवाद नाही का ? हा तुमचा सरकारी नक्षलवाद नाही का?. हा नक्षलवादच आहे. सत्तेचा दुरुपयोग करणं, हा शहरी नक्षलवादापेक्षा भयानक आहे. लोकशाहीची हत्या करण्यासारखं आहे. तुम्ही खरे नक्षलवादी आहे असा आरोप शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

मोदींना थेट आव्हान

मिंध्यांना मी सांगतो, भाजपला सांगतो, तुम्हाला आव्हान देतो, षंड नसाल तर शिवसेना प्रमुखांचा फोटो न लावता, धनुष्यबाण न लावता, शिवसेनेचं नाव न लावता लढून दाखवा. नाही तर षंढ म्हणून गावात फिरू नका. आम्ही शिवसेनाप्रमुखांखेरीज कुणाचाही फोटो वापरला नाही. कुणाचाही वापरणार नाही. मोदींचा तर वापरणारच नाहीच. मोदींना आव्हान आहे. विधानसभा निवडणुकीत या मी आणि तुम्ही आहे. या षंढांना बाजूला करा. वडील चोरायची नाही, धनुष्यबाण चोरायचा नाही. मिंध्याच्या वडलांचे फोटो लावा आणि या समोर असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी यावेळी थेट मिंध्यांना केला. माझ्या वडिलांचा फोटो लावून तुमचा स्ट्राईक रेट कसला सांगता असा सवालच उद्धव ठाकरे यांनी केला.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.