Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आता मी धक्का पुरुष झालोय त्यामुळे…’ उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं आहे.

'आता मी धक्का पुरुष झालोय त्यामुळे...' उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन
Follow us
| Updated on: Feb 20, 2025 | 5:17 PM

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं आहे. ते कुर्ला, कलिना येथील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. विभागक्रमांक 6 च्या विभागप्रमुखपदी सोमनाथ सापळे यांची नियुक्ती झाल्यानंतर पदाधिकारी भेटायला गेलेले असताना त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

आता मी धक्का पुरुष झालो आहे,  असे कोण किती धक्के देतंय ते बघुयात. यांना काय धक्के द्यायचे ते आता देऊद्यात. पण आपण एकच धक्का असा देऊ की हे पुन्हा दिसणार नाहीत. जपानमध्ये भूकंपाचे धक्के बसले नाहीत तर आश्चर्य व्यक्त केल जात, तसं आता उद्धव ठाकरे यांना धक्का बसला नाही तर आश्चर्य व्यक्त केलं जातं. कोण किती धक्के देतंय ते बघू,  पण आपण एकच धक्का असा देऊ की हे पुन्हा दिसणार नाहीत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे.  एकादा निर्णय घेतल्यावर नाराजी असतेच, सैनिक म्हंटल्यावर शिस्त असली पाहिजे. ही लढाई एकट्या-दुकट्याची नाही तर ही लढाई आपली आहे. आपल्या मुळावर घाव घालण्यासाठी ते सरसावले आहेत. आपल्याच लाकडाचा दांडा करून कुदळ करून शिवसेना आणि मराठी माणसाच्या मुळावर घाव घालण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे आता आपण एकत्र राहिलं पाहिजे.

संघटनात्मक बांधणी करण्याचे हे दिवस आहेत. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिल मे मध्ये लागण्याची दाट शक्यता आहे.  त्यामुळे आता दिलेली कामं सर्वांनी करा. शाखेनुसार कामाला लागा.  विधानसभेत जो अनुभव आला तो अनुभव लक्षात घेता आता ती चूक पुन्हा होणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्...
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्....
प्रशांत कोरटकर न्यायालयाबाहेर येताच शिवप्रेमी आक्रमक
प्रशांत कोरटकर न्यायालयाबाहेर येताच शिवप्रेमी आक्रमक.
औरंगजेबने संभाजींना मनुस्मृतीप्रमाणे.., काँग्रेस नेत्याचा खळबळजनक आरोप
औरंगजेबने संभाजींना मनुस्मृतीप्रमाणे.., काँग्रेस नेत्याचा खळबळजनक आरोप.
धक्कादायक! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडले 6 ते 7 अर्भकं
धक्कादायक! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडले 6 ते 7 अर्भकं.
दिशा सालियन प्रकणात ठाकरे फसणार? अ‍ॅड. ओझांनी आरोपींची नावंच सांगितली
दिशा सालियन प्रकणात ठाकरे फसणार? अ‍ॅड. ओझांनी आरोपींची नावंच सांगितली.
बलात्कारी, दंगेखोरांचा पुळका कशाला? मुख्यमंत्र्यांचा थेट सवाल
बलात्कारी, दंगेखोरांचा पुळका कशाला? मुख्यमंत्र्यांचा थेट सवाल.
संजय राऊतांना राजकीय नेते मंडळींकडून शिवीगाळ, 'हारामXXX अन्...'
संजय राऊतांना राजकीय नेते मंडळींकडून शिवीगाळ, 'हारामXXX अन्...'.
जयकुमार गोरे प्रकरणात सुप्रिया सुळे, रोहित पवारांचा हात?
जयकुमार गोरे प्रकरणात सुप्रिया सुळे, रोहित पवारांचा हात?.
भुजबळ संपूर्ण सभागृह डोक्यावर घ्यायचे पण..,विरोधकांना फडणवीसांचा चिमटा
भुजबळ संपूर्ण सभागृह डोक्यावर घ्यायचे पण..,विरोधकांना फडणवीसांचा चिमटा.
साहब के बारे में क्या बोला तूने, शिवसैनिकाची कामराला धमकी,ऑडिओ व्हायरल
साहब के बारे में क्या बोला तूने, शिवसैनिकाची कामराला धमकी,ऑडिओ व्हायरल.