कोल्हापूरात असा साजरा केला स्वातंत्र्याचा महोत्सव; उदगाव येथे कृष्णा नदीत 9 किलोमीटर पुरातून पोहत फडकविला तिरंगा

प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात सत्यनारायणाची पूजा घालून 700 ते 800 लोकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करणे तसेच मे महिन्यामध्ये बालवाडीपासून ते कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी पोहण्याच्या स्पर्धा आयोजित केली जातात. तर सद्या 75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उदगाव येथील कृष्णमाई जलतरण मंडळानेही 9 किलोमीटर अंतरावर हातात तिरंगा घेऊन पोहत येण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रविवारी पहाटे या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.

कोल्हापूरात असा साजरा केला स्वातंत्र्याचा महोत्सव; उदगाव येथे कृष्णा नदीत 9 किलोमीटर पुरातून पोहत फडकविला तिरंगा
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 5:11 PM

इचलकरंजीः देशात सध्या सर्वत्र 15 ऑगस्टनिमित्त स्वातंत्र्याच्या (Independence day) अमृत महोत्सवानिमित्त अनेक प्रकारचे कार्यक्रम होत् आहेत. महाराष्ट्रातही विविध पद्धतीने कार्यक्रम साजरे होत असून कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव (Udgaon Kolhapur) येथील कृष्णमाई जलतरण मंडळातर्फेही (Krishnmai Jaltaran Mandal) अनोख्या पद्धतीने कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे. 15 ऑगस्टच्या निमित्ताने कृष्णामाई जलतरण मंडळाच्या सदस्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला. आझादीचा महोत्सवनिमित्ताने आज 14 ऑगस्ट रोजी 15 ऑगस्टच्यानिमित्ताने हातात तिरंगा ध्वज घेऊन मंडळातील सदस्यांनी हरिपूर (ता. मिरज) येथील कृष्णा-वारणा नदीच्या संगमापासून ते उदगाव (ता. शिरोळ) येथील कृष्णाघाटपर्यंत तब्बल 9 किलोमीटरचे अंतर 1 तास 10 मिनिटांमध्ये महापुरातून साहसी जलप्रवास पूर्ण करण्यात आले. यामध्ये मंडळाच्या 22 जणांचा समावेश होता.

कृष्णमाई जलतरणचा स्तुत्य उपक्रम

उदगाव (ता. शिरोळ) येथील कृष्णमाई जलतरण मंडळातर्फे अनेक विधायक कामे हाती घेतलेली आहेत. कृष्णाघाटवरील स्वच्छता, ब्रिटीश कालीन पुलावरील दगडी बांधकामातील अनावश्यक झाडे तोडणे, पर्यावरण स्वच्छ ठेवणे तसेच असंख्य मुलामुलींना मोफत पोहण्यास शिकवणे तसेच हरिपूर ते उदगाव कृष्णाघाट व कृष्णाघाट उदगाव ते मिरज असा जवळपास 20 किलोमीटर अंतराचा साहसी जलप्रवासाच्या स्पर्धा आयोजित करणे इत्यादी उपक्रम राबवून साहसी शालेय मुला मुलींना प्रोत्साहनपर बक्षिसे देवून गौरविणे अशी अनेक कामे केली जात आहेत.

तिरंगा घेऊन नदीतून 9 कि.मी. प्रवास

या उपक्रमाबरोबरच बरोबर प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात सत्यनारायणाची पूजा घालून 700 ते 800 लोकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करणे तसेच मे महिन्यामध्ये बालवाडीपासून ते कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी पोहण्याच्या स्पर्धा आयोजित केली जातात. तर सद्या 75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उदगाव येथील कृष्णमाई जलतरण मंडळानेही 9 किलोमीटर अंतरावर हातात तिरंगा घेऊन पोहत येण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रविवारी पहाटे या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.

मंडळाचे सदस्य आणि कार्यकर्ते

यामध्ये राजू कलगुटगी, प्रा.सुनिल बनहट्टी, जयपाल मगदूम, गणेश पाचंगे, नितीन पाटील,तानाजी जाधव,महेश महाडिक, ऋषभ पाटील, विक्रम घाटगे, संतोष चुडाप्पा, कोळेकर अण्णा,बाळासाहेब चौगुले तसेच मंडळाच्या अनेक सदस्यांनी पुढाकार घेऊन पोहत तिरंगा फडकवत हरिपूरपासून उदगावपर्यंत आणण्यात आला. हा उपक्रम पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.