युक्रेनमध्ये नाशिकचे अजूनही 15 विद्यार्थी, 1 श्वान अडकला; सुटकेसाठी प्रयत्नांची शिकस्त
भारतीय दूतावासाने युक्रेनमधील भारतीय विद्यार्थी आणि भारतीय नागरिकांसाठी काही सूचना दिल्यात. त्यांच्या मायदेशी परतण्याची लवकरच सोय करण्यात येणार आहे. त्यांनी पासपोर्ट आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जवळ ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिकः रशियाने (Russia) नाटो आणि अमेरिकेच्या इशाऱ्याला भीक न घालता युक्रेन (Ukraine) हे चिमुकले राष्ट्र घशात घालण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. युक्रेनमध्ये भारतातील हजारो विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केले. मात्र, अजूनही नाशिकमधील (Nashik) 15 विद्यार्थी आणि 1 श्वान युक्रेनमध्ये अडकला आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्णा देशपांडे यांनी दिली आहे. त्यामुळे या पालकांचे नातेवाईक आणि कुटुंबीय चिंतेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाटी नाशिक जिल्हा प्रशासनाने प्रयत्नांची शिकस्त सुरू केली आहे. ते लवकरच नाशिकमध्ये परततील असा विश्वास व्यक्त होत आहे.
प्रशासन काय म्हणते?
रशिया-युक्रेन युद्धाने जग हादरून गेले आहे. या वणव्यात अनेक भारतीय होरपळून निघतायत. अखेर या संकटातून सुटून नाशिकचे पाच विद्यार्थी मायदेशी सुखरूप पोहचले आहेत. त्यात मखमलाबाद येथील रिद्धी शर्मा या विद्यार्थीनीचाही समावेश आहे. मात्र, अजून जिल्ह्यातील आठेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, हा आकडा आता 15 वर आलाय. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्या सुटकेसाठी जिल्हा प्रशासनाला साकडे घातले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या युक्रेनमधील नाशिकचे पाच विद्यार्थी परतले आहेत. मात्र, अजूनही पंधरा विद्यार्थी आणि एक श्वान तिथे अडकला आहे. त्याच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत.
लवकरच सोय करणार
भारतीय दूतावासाने युक्रेनमधील भारतीय विद्यार्थी आणि भारतीय नागरिकांसाठी काही सूचना दिल्यात. त्यांच्या मायदेशी परतण्याची लवकरच सोय करण्यात येणार आहे. त्यांनी पासपोर्ट आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जवळ ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय भारतीय दूतावासाची अधिकृत संकेतस्थळे, सोशल मीडिया हँडल पाहावीत. सध्या काय परिस्थिती आहे, याची माहिती घ्यावी असे आवाहन केले.
हेल्पाइन क्रमांक सुरू
युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी आणि नागरिकांसाटी परराष्ट्र मंत्रालय आणि नाशिक जिल्ह्याधिकारी कार्यालयानेही हेल्पलाइन तयार केली आहे. कोणतेही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय,नाशिक 0253- 2317151 या दूरध्वनी क्रमांकावर टोल फ्री. क्रमांक 1077 आणि ddmanashik@gmail.com या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे. सर्व हेल्पलाइन क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत…
भारतीय दूतावासाची युक्रेनमधील हेल्पलाइन
+38 0997300483
+38 0997300428
+38 0933980327
+38 0625917881
+38 0935046170
पररराष्ट्र मंत्रालयाची भारतातील हेल्पलाइन
01123012113
01123014104
01123017905
1800118797 (टोल फ्री)
011-23088124 (फॅक्स )
ई-मेल situationroom@mea.gov.in
नाशिकमधील हेल्पलाइन
0253- 2317151
1077 (टोल फ्री)
ई-मेल ddmanashik@gmail.com
इतर बातम्याः
कोट्यवधींची उड्डाणे घेणाऱ्या साहित्य संमेलनाचा हिशेब द्या; नाशिकमध्ये निमंत्रकांना घरचा आहेर
Nashik | गाडगेबाबांच्या धर्मशाळेत 85 वर्षांपासून अविरत अन्नछत्र; वंचिताचा अनोखा आधारवड!