हजार रुपयांच्या खरेदीवर एक लिटर पेट्रोल फ्री…, उल्हासनगरच्या व्यापाऱ्याची भन्नाट आयडिया

वाढती महागाई आणि त्यात पेट्रोलच्या दरांनी गाठलेली शंभरी यामुळे सध्या (Ulhasnagar Shop Keeper Interesting Offer) सर्वसामान्यांच्या तोंडचं पाणी पळालंय.

हजार रुपयांच्या खरेदीवर एक लिटर पेट्रोल फ्री..., उल्हासनगरच्या व्यापाऱ्याची भन्नाट आयडिया
Ulhasnagar Shop
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 9:03 AM

उल्हासनगर : वाढती महागाई आणि त्यात पेट्रोलच्या दरांनी गाठलेली शंभरी यामुळे सध्या (Ulhasnagar Shop Keeper Interesting Offer) सर्वसामान्यांच्या तोंडचं पाणी पळालंय. याच परिस्थितीचा फायदा घेत उल्हासनगरच्या एका व्यापाऱ्यांनं भन्नाट शक्कल लढवलीये. एक हजार रुपयांच्या खरेदीवर एक लिटर पेट्रोल फ्री देण्याची घोषणा या व्यापाऱ्यानं केलीये. त्याच्या या ऑफरला ग्राहकही चांगला प्रतिसाद देतायत (Ulhasnagar Shop Keeper Interesting Offer Get 1 lt Petrol Free On Purchase On 1 Thousand Rs).

उल्हासनगरच्या शिरु चौकात असलेल्या शीतल हँडलूम या दुकानाच्या मालकानं ही नवी ऑफर मार्केटमध्ये आणलीये. या दुकानात चादरी आणि पडदे विकले जातात. सध्याच्या परिस्थितीत बाजार थंड असल्यानं या दुकानाचे मालक ललित शिवकानी यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही आगळीवेगळी ऑफर आणलीये. यासाठी 17 सेक्शनच्या एचपी पेट्रोलपंपासोबत दुकानमालकाने टायअप केलंय.

या दुकानातून तुम्ही एक हजार रुपयांच्या चादरी किंवा पडदे घेतले, तर तुम्हाला एक लिटर पेट्रोलचं एक कुपन दिलं जातं. हे कुपन तुम्ही पेट्रोलपंपावर देऊन एक लिटर पेट्रोल मोफत मिळवू शकता. याबाबतचा फलक मालक ललित शिवकानी यांनी दुकानाच्या बाहेरसुद्धा लावला असून त्यांच्या या ऑफरची सध्या उल्हासनगरात चर्चा आहे.

3 दिवसात 28 ग्राहकांना मिळालं मोफत पेट्रोल

या अनोख्या आयडियाला ग्राहकांमधूनही चांगला प्रतिसाद मिळतोय. गेल्या तीन दिवसात 28 ग्राहकांनी 1 हजारापेक्षा जास्त खरेदी करत हे कुपन मिळवलंय. त्यामुळे खरेदी आणि पेट्रोल असा दुहेरी फायदा ग्राहक घेतायत.

पेट्रोलच्या दराने शंभरी गाठल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाचं गणित बिघडलंय. त्यात पेट्रोलचे दर कमी करण्यासाठी दररोज आंदोलनं होतायत. मात्र याही परिस्थितीत व्यापाऱ्याने आपला धंदा वाढवण्यासाठी केलेला हा फंडा नक्कीच वेगळा आहे.

Ulhasnagar Shop Keeper Interesting Offer Get 1 lt Petrol Free On Purchase On 1 Thousand Rs.

संबंधित बातम्या :

सौदीच्या तेल विहिरींवर हल्ले, पेट्रोल-डिझेल दरवाढीने होरपळणाऱ्या भारताला पुन्हा चटके

हे तर BMC चं बजेट, ठाकरे सरकारला पेट्रोल-डिझेलवर बोलण्याचा अधिकारच नाही : देवेंद्र फडणवीस

…तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आणखी भडकणार; ‘हे’ एक मोठे कारण

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.