Budget 2025 LIVE : आत्मनिर्भर भारताच्या मोहिमेला बळ मिळणार – नरेंद्र मोदी
Budget Session 2025 Parliament LIVE : आज 1 फेब्रुवारी 2025. आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचे बजेट सादर केलं. देश, विदेशातील महत्वाच्या घडामोडींसह बजेटविषयी सर्व माहिती, अपडेट्स तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES
-
राहुल गांधींची दिल्लीत भाजपा आणि केजरीवाल यांच्यावर टीका
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सदर बाजारातील जाहीर सभेला संबोधित करताना म्हटले, “… ते (भाजप) जे काही करतात ते फक्त अदानी आणि अंबानींना मदत करण्यासाठी… अरविंद केजरीवाल म्हणाले होते की मी दिल्लीचा आहे. मी राजकारण बदलणार आहे. …सर्वात मोठा दारू घोटाळा मनीष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल यांनी केला.”
-
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची संसद भवनात भेट घेतली
अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची संसद भवनात भेट घेतली. लोकसभा अध्यक्षांनी त्यांचे अभिनंदन करून सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
-
-
सपा प्रमुख अखिलेश यादव यांची केंद्रीय अर्थसंकल्पावर टीकास्त्र
सपा प्रमुख अखिलेश यादव केंद्रीय अर्थसंकल्प 2025 वर म्हणाले, “हा अर्थसंकल्प कोणासाठी आला आहे? तुमची (भाजप) शहरे आणि रस्ते इतके लोक (महा कुंभ भक्त) हाताळण्याची क्षमता नाही… तुमची रचना कशी आहे? शहरांमध्ये तुम्ही स्मार्ट इंडिया आणि स्मार्ट सिटीज बनवत आहात… तुम्ही (भाजप) काय व्यवस्था करत आहात?”
-
पालघर : तर अशोक धोडी वाचले असते – उत्तम पिंपळे
जर पहिल्या पाच दिवसात योग्य प्रकारे तपास केला असता तर अशोक धोडी वाचले असते असे शिवसेना उबाटा गटाचे उपनेते उत्तम पिंपळे यांनी म्हटले आहे.
-
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना पेपर देण्याचे कॉल करणाऱ्यांना अटक
एमपीएससी विद्यार्थ्यांना परीक्षा पूर्वी पेपर देतो असे कॉल करणाऱ्या दोघांना पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.
-
-
बीड : डॉ. अशोक थोरात धनंजय देशमुख यांच्या भेटीला
बीड-मस्साजोग येथे शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या बंधू धनंजय देशमुख यांच्या भेटीला आले आहेत.
-
राज ठाकरेंच्या भाषणाची सामनामध्ये दखल; एकनाथ शिंदेंनी लगावला टोला
सामनामध्ये राज ठाकरेंच्या भाषणाची दखल घेतली त्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ” पंतप्रधान मोदी, अमितभाई आणि आमच्या महायुतीबद्दल जे लोक वाईट बोलतील त्यांचं कौतुक सामना मध्येच होणारच ना” असं म्हणत शिंदेनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच पुढे ते म्हणाले , “आमच्या विरुद्ध बोलणं, शिव्या , देणे हे त्यांचे कर्तव्य आहे..ते कर्तव्य पार पाडत आहे”असं म्हणत शिंदेंनी टोला लगावला.
दरम्यान “आपल्या देशातील निवडणूक व निवडणूक यंत्रणा राबविणारी व्यवस्था म्हणजे लुटारूंच्या टोळ्याच झाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाशी विशेष सख्य असलेले ‘मनसे’ प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या निवडणूक निकालांवर अचानक संशय व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी त्यांची भूमिका होती, आता फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी महाराष्ट्राच्या एकंदरीत निकालांवर राज यांनी आक्षेप घेतला आहे,” असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षाच्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यातील भाषणाची दखल घेतली.
-
-
संतोष देशमुखांच्या कुटुंबाची जबाबदारी भगवान गड घ्यायला तयार: नामदेव शास्त्री
नामदेव महाराज शास्त्री यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबाची जबाबदारी भगवान गड उचलायला तयार आहे असं म्हटलं आहे. मात्र याबाबत संतोष देशमुखांच्या कुटुंबांने यावर आम्हाला मदत नको न्याय हवा असा प्रतिसाद दिला आहे. तसेच ‘धनंजय मुंडे हा खंडणी घेऊन जगणारा माणूस नाहीय’, नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर देखील त्यांच्या कुटुंबाने आक्षेप घेतला आहे.
-
हे तर ऐतिहासिक बजेट -नितीन गडकरी
हे तर ऐतिहासिक बजेट असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. या बजेटमुळे देशाला आणि अर्थव्यवस्थेला मजबुती मिळेल असे ते म्हणाले.
-
शेतीच्या अवजारावर जीएसटी कमी नाही
शेतकऱ्यांना शेतीच्या अवजारावर जीएसटी भरावा लागतो तो कमी झालेला नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी दिली. शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे त्याची पूर्तता अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही, असे त्या म्हणाल्या.
-
12 लाखच्या कर सवलतींचा यांना नाही फायदा
बजेटची अजून एक बाजू समोर आली आहे. यामध्ये 12.75 लाखांपर्यंत कर सवलत देण्यात आली आहे. अर्थात ही सवलत केवळ त्यांनाच मिळेल, ज्यांचे उत्पन्न हे केवळ वेतनातून येईल. जर एखाद्या व्यक्तीची शेअर बाजार, म्युच्युअल फंड वा इतर गुंतवणुकीतून फायदा होत असेल तर अशा लोकांना ही सवलत मिळणार नाही. त्यांना त्यांच्या उत्पन्नावर कर द्यावा लागेल.
-
विकसित भारताचे स्वप्न साकारणारे बजेट
विकसित भारताचे स्वप्न साकारणारे बजेट आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. विरोधक काय म्हणतात त्यापेक्षा जनता काय म्हणते ते महत्वाचं असल्याचे ते म्हणाले.
-
वैद्यकीय क्षेत्राला मोठा दिलासा
देशात 2014 पासून वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 1.1 लाख जागा वाढवल्या आहेत. तसेच नवीन वर्षात महाविद्यालय आणि रुग्णालयात 10 हजार अतिरिक्त जागा वाढवल्या जाणार आहेत. कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवरील एकूण 36 औषधांवरील सीमाशुल्क हटवण्यात येणार आहे. तसेच 6 औषधं सवलतीच्या दरात दिली जाणार आहेत. देशात येत्या 3 वर्षांमध्ये सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डे केअर कॅन्सर सेंटर्सची स्थापना केली जाईल
-
इलेक्ट्रिक वाहन खरेदीदारांना दिलासा
बजेटमध्ये इलेक्ट्रिक वाहन खरेदीदारांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सुस्तावलेल्या ऑटो सेक्टरला यामुळे गती मिळाली आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी या बजेटमध्ये एक रोडमॅप तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इलेक्ट्रिक वाहन पूर्वीपेक्षा स्वस्त होतील. बॅटरी आणि इतर सुट्टे पार्ट स्वस्त होण्याची शक्यता वाढली आहे. इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची विक्री वाढणार आहे.
-
नागपूरमध्ये ‘अमृतकाल’ कार्यक्रम
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावरून एअरपोर्ट च्या दिशेने रवाना झाले आहे. ‘अमृतकाल’ केंद्रीय अर्थसंकल्पावरील कार्यक्रमाला उपस्थित राहतील. सायंकाळी नागपूरमध्ये हा कार्यक्रम होईल.
-
Budget 2025 : आत्मनिर्भर भारताच्या मोहिमेला बळ देणारं बजेट – नरेंद्र मोदी
आत्मनिर्भर भारताच्या मोहिमेला बळ देणारं बजेट, सर्व भारतीयांचं स्वप्न पूर्ण करणारं बजेट. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं अभिनंदन – पंतप्रधान नरेंद्र मोदी.
-
12 लाखांपेक्षा ‘इतके’ जास्त उत्पन्न असलेल्यांनाही नो टॅक्स, नेमकं गणित काय?
12 लाखांपेक्षा ‘इतके’ जास्त उत्पन्न असलेल्यांनाही नो टॅक्स, नेमकं गणित काय?
-
नीतिशकुमार बिहारला काहीच मिळवून देऊ शकले नाहीत – तेजस्वी यादव
चंद्राबाबू नायडू हे पॅकेज घेऊन निघून गेले पण नीतिश कुमार मात्र बिहारसाठी काहीच मिळवू शकल नाहीत - तेजस्वी यादव
-
Budget 2025 : भारत देश सुबत्तेच्या दिशेनं वाटचाल करु लागल्याची ही शुभचिन्हे – एकनाथ शिंदे
एक सर्वांगसुंदर, आत्मनिर्भर भारताला सबळ करणारा हा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मी आदरणीय केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करतो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
लक्ष्मीच्या पाऊलखुणा उमटल्या…
देशाचे लोकप्रिय आणि कर्तृत्ववान पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी विकसित भारताचं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात येणार, याची खात्री देणारा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात सामान्य नोकरदार वर्गाला जो दिलासा मिळालाय, त्याचं वर्णन अभूतपूर्व…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 1, 2025
-
Budget 2025 : अर्थसंकल्पावर विरोधकांची प्रतिक्रिया काय ?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यानंतर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्य आहेत. काँग्रेस खासदार शशी थरूर काय म्हणाले ?
PTI INFOGRAPHICS | Union Budget 2025: Who said what after Finance Minister Nirmala Sitharaman presented the budget (n/36)#BudgetSessionWithPTI #Budget2025WithPTI pic.twitter.com/S21rC3qbVC
— Press Trust of India (@PTI_News) February 1, 2025
-
Budget 2025 : महाराष्ट्राचं बजेट कधी सादर होणार ?अजित पवारांनी सांगितली तारीख
देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता महाराष्ट्राचं बजेट कधी याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्याचं बजेट सादर होणार असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. शेतकरी, लाडक्या बहिणींचा विचार करूनच बजेट सादर करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
-
Budget 2025 : 2025-26 चं बजेट ऐकून काय म्हणाले रामदास आठवले ?
2025-26 चं जे बजेट आहे त्यामुळे देशातील सर्व लोकांना न्याय मिळणार आहे
आणि पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही काय आहोत ते विरोधकांना कळणार आहे –
अशी शेरोशायरी सादर करत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी बजेटवर प्रतिक्रिया दिली.
-
Budget 2025 : मी आयुष्यात कधी इन्व्हेस्टमेंट केली नाही, मात्र मी लोकांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो – देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र कापूस लावणारा शहर आहे, शेतकऱ्यांना बजेटचा फायदा होईल. मी आयुष्यात कधी इन्व्हेस्टमेंट केली नाही, मात्र मी लोकांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो.
एक्स्ट्रा इन्कम येत असेल तर जास्त व्याज देतात त्याचा मोह न बाळगता, सर्व गोष्टी तपासून चांगले एक्सपर्ट असतील त्याच स्कीम मध्ये इन्व्हेस्टमेंट करा असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.
-
Budget 2025 : गंभीर आजाराची 36 औषधे ड्युटी फ्री… केंद्र सरकारची सर्वात मोठी घोषणा
गंभीर आजाराची 36 औषधे ड्युटी फ्री… केंद्र सरकारची सर्वात मोठी घोषणा
-
Budget 2025 : नव्या कररचनेचा मध्यमवर्गीय, तरूणांना फायदा – देवेंद्र फडणवीस
12 लाख उत्पन्न असणाऱ्यांना आता टॅक्स भरावा लागणार नाही. याचा फायदा आता मध्यम वर्गीय आणि तरुणांना होणार आहे. यामुळे रोजगार निर्मिती होणार आहे, अतिशय धीराने घेतेलेला हा निर्णय आहे. देशाच्या आर्थिक विकासात एक मैलाचा दगड ठरणार आहे.
तेल बियांच्या बाबत देखील निर्णय घेतला, शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळण्यासाठी त्याचा फायदा मिळणार आहे. मासेमारी करणाऱ्यांना फायदा होणार आहे. शेतीसाठी देखील मोठी गुंतवणूक करण्यात आलेली आहे – देवेंद्र फडणवीस.
-
नोकरदारांची बल्ले बल्ले; आता खिसा नाही कापणार,नवीन कर रचना काय?
-
Income Tax Slabs : नवी कररचना कशी ? घ्या समजून
12 लाख रुपयांपर्यंत कोणताही कर लागणार नाही. नवी कररचना कशी? समजून घ्या.
4 लाखांपर्यंत उत्पन्न – 0 टक्के
4 ते 8 लाख रुपयांवर 5 टक्के
8 ते 12 लाख रुपयांवर 10 टक्के
12 ते 16 लाख रुपयांवर 15 टक्के
16 ते 20 लाख रुपयांवर 20 टक्के
20 ते 24 लाख रुपयांवर 25 टक्के
24 पेक्षा जास्त 30 टक्के
VIDEO | “Slabs and rates are being changed across the board to benefit all taxpayers. The new structure will substantially reduce taxes of middle class and leave more money in their hands, boosting household consumption, savings and investment. In the new tax regime, I propose to… pic.twitter.com/7op7tZSJ85
— Press Trust of India (@PTI_News) February 1, 2025
-
Income Tax Slabs : 18 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 70 हजारांची सूट
नव्या कररचनेअंतर्गत 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही.
महिन्याला 1 लाख उत्पन्न असणाऱ्यांना कुठलाही कर नाही.
18 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 70 हजारांची सूट
25 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 1 लाख 20 हजारांची सूट
#UnionBudget2025 | “There will be no Income Tax payable up to an income of Rs 12 Lakh,” announces FM Nirmala Sitharaman. pic.twitter.com/ucEROx9jS0
— ANI (@ANI) February 1, 2025
-
Income Tax Slabs : 12 लाख रुपयांपर्यंत इन्कम टॅक्समध्ये सूट – निर्मला सीतारमण
नव्या कररचनेअंतर्गत 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही – अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा
#UnionBudget2025 | “There will be no Income Tax payable up to an income of Rs 12 Lakh,” announces FM Nirmala Sitharaman. pic.twitter.com/ucEROx9jS0
— ANI (@ANI) February 1, 2025
-
Income Tax Slabs : ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा , टीडीएसची मर्यादा 1 लाखांपर्यंत वाढवली.
नवीन आयकर विधेयकामुळे गुंतागुंत कमी होणार.
मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नात वाढ करणं हे नव्या विधेयकाचं उद्दिष्ट.
टीडीएसमध्ये सुलभता आणणार.
ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएसची मर्यादा 1 लाखांपर्यंत वाढवली.
आयकर भरण्याची मर्यादा 4 वर्षांपर्यंत वाढवली. 4 वर्षांपर्यंत अपडेटेड टॅक्स रिटर्न भरू शकता.
-
Budget Announcement : काय होणार स्वस्त ?
टीव्ही, मोबाईल, औषध आणि इलेक्ट्रिक कार होणार स्वस्त, अर्थसंकल्पात घोषणा.
मोबाईल फोन, एलईडी, एलसीडी टीव्ही , चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार आहेत.
-
Nirmala Sitharaman Speech : 36 जीवनावश्यक औषधांना करामध्ये सूट
36 जीवनावश्क औषधांना करामध्ये सूट जाहीर, कॅन्सरची औषधं स्वस्त होणार, कॅन्सरच्या 36 औषधांवरची कस्टम ड्युटी हटवली.
-
Budget 2025 : पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक आणणार
पुढील आठवड्यात सरकार नवीन आयकर विधेयक आणणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलं. नव्या आयकर विधेयकाचा टॅक्स स्लॅबशी संबंध नाही. नवीन बिल म्हणजे आयकराच्या पद्धतीत बदल.
#UnionBudget2025 | “I propose to introduce the New Income Tax Bill next week,” says FM Nirmala Sitharaman in Parliament pic.twitter.com/yfHIjzyMxu
— ANI (@ANI) February 1, 2025
-
Budget 2025 : शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता, किसान क्रेडिट कार्डची वाढली मर्यादा
शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता, किसान क्रेडिट कार्डची वाढली मर्यादा, कृषी क्षेत्रात आत्मनिर्भरतेचा नारा
-
Nirmala Sitharaman Speech : अर्थमंत्र्यांच्या महत्वाच्या घोषणा
एकूण 20,000 कोटी रुपयांचे अणुऊर्जा मिशन तयार केले जाईल, 2047 पर्यंत 100 GW अणुऊर्जा क्षमता निर्माण करण्याचे लक्ष्य आहे.
वीज वितरण कंपन्यांमधील सुधारणांना प्रोत्साहन दिले जाईल, सुधारणांचा पाठपुरावा करण्यासाठी राज्यांना GSDP च्या 0.5 टक्के कर्जाची परवानगी दिली जाईल.
प्रथमच व्यवसाय करणाऱ्या पाच लाख महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उद्योजकांना सरकार 2 कोटी रुपयांचे कर्ज देणार .
परवडणाऱ्या घरांची अतिरिक्त 40,000 युनिट्स 2025 मध्ये पूर्ण केली जातील.
सरकार 120 गंतव्यस्थानांना जोडण्यासाठी सुधारित उडान योजना सुरू करणार आहे, ज्यामुळे 4 कोटी अतिरिक्त प्रवाशांना मदत होईल.
-
Budget 2025 : व्हिजासाठीचे नियम सोपे करणार
व्हिजासाठीचे नियम सोपे करणार. LIVE व्हिसाची पद्धत आणखी सोपी होणार,भारतात उपचार घेऊ इच्छिणाऱ्यांना सहज व्हिसा मिळणार.
भगवान बुद्धांशी संबंधित जागांचा विकास करणार.
-
Nirmala Sitharaman Speech : न्यूक्लिअर एनर्जीच्या माध्यमातून 100 गिगावॅट उर्जा उत्पादनाचं लक्ष्य
विकसित भारतासाठी न्यूक्लिअर एनर्जी मिशन – 2047 पर्यंत न्यूक्लिअर एनर्जीच्या माध्यमातून 100 गिगावॅट उर्जा उत्पादनाचं लक्ष्य आहे.
-
Nirmala Sitharaman Speech : मेडिकल कॉलेजमध्ये 75 हजार जागा वाढवण्यात
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पुढील वर्षापासून मेडिकल कॉलेजमध्ये 75 हजार जागा वाढवण्यात येणार .
आयआयटीच्या 6500 जागा वाढवणार
देशात 3 AI एक्सल्स सेंटर उभारणार
– अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा
-
Nirmala Sitharaman Speech : पायाभूत सुविधांसाठी राज्यांना दीड लाख कोटी
पायाभूत सुविधांसाठी राज्यांना दीड लाख कोटी.
-
Budget 2025 : सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजना
सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजना जाहीर. यात ८ कोटींहून अधिक मुलांना पोषक आहार पुरवला जाणार.
सर्व सरकारी माध्यमिक शाळा व प्रायमरी आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवली जाईल. अटल टिंकरिंग लॅब, अशा 50 लाख लॅब पुढच्या पाच वर्षांत सरकारी शाळांमध्ये उभ्या केल्या जातील.
-
Budget 2025 : डाळींमध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी 6 वर्षांचा कार्यक्रम
डाळींमध्ये स्वावलंबी होण्यासाठी सरकार 6 वर्षांचा कार्यक्रम सुरू करणार असून, तूर, उडीद आणि मसूर या पिकांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. भाजीपाला आणि फळांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि किफायतशीर दर देण्यासाठी व्यापक कार्यक्रम सुरू केला जाईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
-
Budget 2025 : खेळणी उद्योगात जगात भारताला अग्रस्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार
खेळणी उद्योगात जगात भारताला अग्रस्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. मेड इन इंडिया ब्रँडच्या नावाने जगभरात टिकाऊ खेळण्यांच्या उत्पादनात भारताला नाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न.
-
Nirmala Sitharaman Speech : किसान क्रेडीट कार्डवरील कर्ज मर्यादेत 3 लाखांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढ
शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा.. किसान क्रेडीट कार्डवरील कर्ज मर्यादेत 3 लाखांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
-
Nirmala Sitharaman Speech : बिहारमध्ये मखाणा बोर्डाची स्थापना करण्यात येणार
बिहारमध्ये मखाणा उत्पादनावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी विशेष मखाणा बोर्डाची स्थापना केली जाईल.
-
Nirmala Sitharaman Speech : कापूस उत्पादकता वाढवण्याला प्रोत्साहन देणार
कापूस उत्पादकता वाढवण्याला प्रोत्साहन देणार.
मत्स्य पालनाला प्रोत्साहन देण्यावर भर.
-
Budget 2025 : सपा खासदारांचा वॉकआऊट
निर्मला सीतारमण या संसदेत अर्थसंकल्पीय भाषण वाचत आहेत. त्या सरकारी योजनांची माहिती देत आहेत. त्याचवेळी सपा खासदारांनी सभात्याग केला.
-
Nirmala Sitharaman Speech : 1.7 कोटी शेतकऱ्यांना धनधान्य कृषी योजनांचा लाभ
कृषीक्षेत्र आत्मनिर्भरतेकडे नेण्यावर आमचा भर. 100 जिल्ह्यांसाठी धनधान्य कृषी योजना, 1.7 कोटी शेतकऱ्यांना धनधान्य कृषी योजनांचा लाभ – निर्मला सीतारमण.
-
Nirmala Sitharaman Speech : खासगी क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यावर सरकारचा भर
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अर्थव्यवस्थेला गती देण्याचं उद्दिष्ट. खासगी क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यावर सरकारचा भर आहे.
-
Nirmala Sitharaman Speech : आरोग्य आणि रोजगारावर आमचं लक्ष – निर्मला सीतारमण
आरोग्य आणि रोजगारावर आमचं लक्ष, पुढती 5 वर्ष विकासाची संधी देणार.
-
Nirmala Sitharaman Speech : भारतातल्या मध्यमवर्गाला बळ देणं या सरकारच्या हेतूंनुसारच हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे
विकासदर वाढवणं, सर्वंकष विकास, खासगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणं, भारतातल्या मध्यमवर्गाला बळ देणं या हेतूंनुसारच हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नमूद केलं.
-
Union Budget2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून बजेट सादर करण्यास सुरूवात
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून बजेट सादर करण्यास सुरूवात झाली आहे.
-
Budget 2025 – अर्थसंकल्पाआधी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 950 अंकानी वधारला.
केंद्रीय अर्थसंकल्प थोड्याच वेलात सादर होणार असून त्याआधी शेअर बाजारात मोठी तेजी आली आहे. सेन्सेक्स 950 अंकांनी वधारला आहे.
-
Budget 2025 : कॅबिनेट बैठकीत केंद्रीय अर्थसंकल्पाला मंजुरी,अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळणार ?
कॅबिनेट बैठकीत केंद्रीय अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली आहे. अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळणार ? याकडे सर्वांचं लक्ष लागल आहे.
-
Budget 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठक सुरू ,केंद्रीय अर्थसंकल्पाला दिली जाणार मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत दाखल झाले असून त्यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठक सुरू झाली आहे. आज केंद्रीय अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाणार आहे.
-
Union Budegt 2025 : कॅबिनेट बैठकीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेच्या दिशेने रवाना
कॅबिनेट बैठकीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. कॅबिनेट बैठकीत बजेटला मंजुरी देण्यात येईल.
-
Budget 2025 : आजच्या बजेटमध्ये शिक्षण, शेतकरी, आरोग्य यांच्यासाठी काही भरीव तरतुदी यात असाव्यात ही अपेक्षा – खा. बळवंत वानखेडे
आज देशाचा अर्थसंकल्प सादर होतोय, हे बजेट सर्वसामान्यांचं असेल अशी अपेक्षा आहे. शिक्षण, शेतकरी, आरोग्य यांच्यासाठी काही भरीव तरतुदी यात असाव्यात ही अपेक्षा आहे. फक्त घोषणा होऊ नयेत, देशाच्या सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून बजेट सादर व्हावं अशी अपेक्षा खा. बळवंत वानखेडे यांनी व्यक्त केली.
SC, ST समाजासाठी घोषणा असतात मात्र त्या आमलात आणल्या जात नाहीत. यांना दिलेला पैसा नंतर इतर विभागाकडे वळवला जातो. ज्या त्या विभागाचा पैसा त्यावर खर्च व्हावा यासाठी कायदा व्हावा, असं मतंही त्यांनी मांडलं.
-
लक्ष्मी केवळ गौतम अदानीवर प्रसन्न
बजेटपूर्वीच खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली. हा अर्थसंकल्प, गोरगरिबांसाठी नाही, तर गौतम अदानींसाठी असल्याचा आरोप त्यांनी केला. लक्ष्मी केवळ गौतम अदानींवर प्रसन्न असल्याचा आरोप त्यांनी केला.
-
अर्थमंत्री संसद भवनात
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या संसद भवनात दाखल झाल्या आहेत. अगदी थोड्याच वेळात त्या अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्य, करदाते, शेतकरी, महिलांना मोठ्या अपेक्षा आहेत. सीतारमण या आठव्यांदा बजेट सादर करतील.
-
मध्यमवर्गावर यंदा तरी मेहरबान होणार का मोदी सरकार? आयकरात मिळेल दिलासा?
मध्यमवर्गावर यंदा तरी मेहरबान होणार का मोदी सरकार? आयकरात मिळेल दिलासा?
-
Budget 2025 : अर्थसंकल्प सादर करण्यासाठी निर्मला सीतारमण सज्ज
Budget 2025 : अर्थसंकल्प सादर करण्यासाठी निर्मला सीतारमण सज्ज
Delhi: Union Finance Minister Nirmala Sitharaman is all set to present #UnionBudget2025 in the Parliament today.
She will present and read out the Budget through a tab, instead of the traditional ‘bahi khata’. pic.twitter.com/Iky9TSOsNW
— ANI (@ANI) February 1, 2025
-
Budget 2025 : थोड्याच वेळात होणार कॅबिनेट बैठक, बजेटला मिळणार मंजुरी
थोड्याच वेळात कॅबिनेट बैठक होणार असून बजेटला मंजुरी मिळेल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण 8 व्या मांडणार देशाचा अर्थसंकल्प.
-
Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थमंत्रालयाच्या दिशेने रवाना
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थमंत्रालयाच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. आज सकाळी 11 वाजता त्या देशाचे बजेट सादर करणार आहेत.
#WATCH | Delhi: Union Finance Minister Nirmala Sitharaman leaves from her residence. She will present #UnionBudget2025 at the Parliament today. pic.twitter.com/kcf4aEZz0h
— ANI (@ANI) February 1, 2025
-
Budget 2025 : आज बजेटमध्ये कोणत्या महत्वाच्या घोषणा होणार ?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्पात विकासदर वाढवण्यावर विशेष भर असेल. खप वाढवण्यासाठी ठोस घोषणा केल्या जातील. रेल्वे, बंदर आणि विमानतळावर कॅपेक्स वाढू शकतो. मध्यमवर्गीयांसाठी अनेक पावले उचलता येतील. इन्कम टॅक्समध्ये मोठे बदल करण्याची तयारी सुरू आहे. स्टँडर्ड डिडक्शन 75000 रुपयांवरून 1 लाख रुपयांपर्यंत वाढवणे अपेक्षित आहे. 20% आणि 30% स्लॅबमध्ये बदल करण्यास वाव आहे. कॉर्पोरेट टॅक्समध्ये थेट सवलत मिळण्याची शक्यता कमी आहे.
-
Budget 2025 : मोदी 3.0 सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प येथे पाहा
-
Budget पूर्वी गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये कपात
आज 2025-36 चा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार असून त्यापूर्वीच LPG गॅस सिलेंडरच्या दरात कपात झाली आहे. देशातील सर्वसामान्य जनतेला गॅस सिलेंडरच्या दरात थोडा दिलासा मिळाला आहे. कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात ही कपात करण्यात आली आहे. मागच्या दोन महिन्यातील दर कपात एकत्र केली तर कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर 20 रुपयापेक्षा जास्त कमी झाले आहेत. मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मार्च 2024 पासून कोणताही बदल झालेला नाही.
-
Union Budget 2025 : कॅबिनेट देणार बजेटला मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक होईल. संसद भवनात होणाऱ्या या बैठकीत बजेटला मंजुरी दिली जाईल.
-
Budget 2025 : विकासाचा वारू उधळला, आर्थिक सर्वेक्षणात दावा काय? भारतीय अर्थव्यवस्था किती सुसाट धावणार?
हेदेखील वाचा
-
Budget 2025 : आज सादर होणार देशाचा अर्थसंकल्प, इन्कम टॅक्सचे स्लॅब बदलणार का ?
आज देशाचा अर्थसंकल्प सादर होणार , करदात्यांसाठी अर्थसंकल्पात काय असणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. इन्कम टॅक्सचे स्लॅब बदलणार का ? चर्चांना उधाण
-
आजपासून रिक्षा , टॅक्सीचा प्रवास 3 रुपयांनी महागला
आजपासून रिक्षा , टॅक्सीचा प्रवास 3 रुपयांनी महागला. आता रिक्षाचे भाडे किमान 26 रुपये, तर टॅक्सीचं किमान भाडं 31 रुपये असेल. वाढत्या भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये चिंतेचं वातावरण.
-
Budget 2025 : अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण 2024-25 केलं सादर
Budget 2025 : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी काल, 31 जानेवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण 2024-25 सादर केलं. या सर्वेक्षणात पुढील वर्षाचा FY26, जीडीपी, वृद्धी दर 6.3 टक्के ते 6.8 टक्के दरम्यान असेल असा अंदाज बांधण्यात आला आहे.
-
Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज देशाचे बजेट सादर करणार आहे
आज (1 फेब्रुवारी )केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचे बजेट अर्थात अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी 3.0 सरकारच्या या बजेटकडे उद्योजक, व्यावसायिकांपासून ते सर्वसामान्यापर्यंत सर्वांचे लक्ष लागले आहे.
काल ( शुक्रवार 31 जानेवारी) पासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं असून आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचे बजेट अर्थात अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी 3.0 सरकारच्या या बजेटकडे उद्योजक, व्यावसायिकांपासून ते सर्वसामान्यापर्यंत सर्वांचे लक्ष लागले आहे. निर्मला सीतारमण या आज सकाळी सकाळी 11 वाजता देशाचे बजेट सादर करतील. केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये काय घोषणा होणार, काय स्वस्त झाले, काय महाग झाले. कोणता कर कमी झाला, कोणता कर वाढला याचा सर्व तपशील तुम्ही या ब्लॉगमध्ये वाचू शकता. बजेट 2025 आणि व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
Published On - Feb 01,2025 7:07 AM





