महाराष्ट्रासाठी खुशखबर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून महत्वाच्या मार्गांसाठी मोठा निधी

रत्यांची पुनर्बांधणी आणि विस्तारीकरणासाठी 2 हजार 780 कोटी रुपयांचा निधी गडकरींनी महाराष्ट्रासाठी देऊ केला आहे.

महाराष्ट्रासाठी खुशखबर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून महत्वाच्या मार्गांसाठी मोठा निधी
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 12:06 AM

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या मार्गांसाठी मोठ्या निधीची घोषणा केलीय. राज्यातील रस्त्याचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांसाठी गडकरींनी या निधीची घोषणा केली आहे. रत्यांची पुनर्बांधणी आणि विस्तारीकरणासाठी 2 हजार 780 कोटी रुपयांचा निधी गडकरींनी महाराष्ट्रासाठी देऊ केला आहे.(Nitin Gadkari announces huge funds for national and state highways in Maharashtra)

नितीन गडकरी यांनी ट्वीटरवरुन देशातील विविध महामार्गांच्या कामांची घोषणा केली. #PragatiKaHighway या हॅशटॅगखाली गडकरी यांनी राष्ट्रीय आणि राज्यमार्गांच्या कामाबाबत घोषणा केल्या आहेत.

कोणत्या कामांना गडकरींकडून मंजुरी?

राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 F – परळी ते गंगाखेड, या महामार्गासाठी 224.44 कोटी रुपयांचा निधी मंजूर

राष्ट्रीय महामार्ग क्र. 543 – आमगाव ते गोंदिया, महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी 239.24 कोटी रुपयांचा निधी मंजूर

राष्ट्रीय महामार्ग क्र. 63 – नांदेड जिल्ह्यात येसगी गावाजवळ मांजरा नदीवरील पूलाच्या कामासाठी 188.69 कोटी रुपयांचा निधी मंजूर

राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 – वाडी/एमआयडीसी जंक्शन 4 पदरी उड्डाणपुलाच्या कामासाठी आणि नागपुरात आरटीओ चौक ते नागपूर विद्यापीठ परिसरापर्यंत उड्डाणपुलाच्या कामासाठी 478.83 कोटी रुपयांचा निधी मंजूर

राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 – 28.2 किलोमीटरच्या रस्त्यासह तिरोरा – गोंदिया राज्य महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी 288.13 कोटी रुपयांचा निधी मंजूर

राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 G – तरेरे-गगनबावडा-कोल्हापूर मार्ग विस्तारीकरणासाठी 167 कोटी रुपयांचा निधी मंजूर

राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 – तिरोरा-गोंदिया भागात दोन पदरी मार्गासाठी 288 कोटी रुपयांचा निधी मंजूर

राष्ट्रीय महामार्ग क्र. 752 I – वाटूर ते चारठाण परिसरात दोन लेनच्या विस्तारीकरण आणि पुनर्बांधणीच्या कामासाठी 228 कोटी रुपयांचा निधी मंजूर

राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 C – गडचिरोली जिल्ह्यात 262 किलोमीटर ते 321 किलोमीटरचे विस्तारीकरण आणि 16 लहान मोठ्या पुलांच्या बांधकामांसाठी 282 कोटी रुपयांचा निधी मंजूर

राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 E – गुहार – चिपळून मार्गावर विस्तारीकरणासाठी 171 कोटी रुपयांचा निधी मंजूर

राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 J – जळगाव – भद्रावन – चाळीसगाव – नांदगाव – मनमाड या रस्त्याच्या चार पदरी विस्तारीकरणाच्या कामासाठी 252 कोटी रुपयांचा निधी मंजूर

इतर बातम्या :

अधिकाऱ्यांच्या नजरचुकीमुळे मोदी सरकारने ‘तो’ आदेश काढला; निर्मला सीतारामन यांची सारवासारव

LPG Cylinder Price : 1 एप्रिलपासून घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त, तुमच्या भागात LPG Cylinder ची किंमत किती?

Nitin Gadkari announces huge funds for national and state highways in Maharashtra

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.