Aurangabad | केंद्रीय राज्यमंत्री Raosaheb Danve यांची डब्बा पार्टी, कार्यकर्त्यांसोबत गप्पांचा फड
औरंगाबादेत (Aurangabad) केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री (Minister) रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी आपल्या मतदारसंघात, कार्यकर्त्यांसोबत डब्बा पार्टीचा उपक्रम सुरू केला आहे.
औरंगाबादेत (Aurangabad) केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री (Minister) रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी आपल्या मतदारसंघात, कार्यकर्त्यांसोबत डब्बा पार्टीचा उपक्रम सुरू केला आहे. आपल्याच कार्यकर्त्यांच्या शेतात परिसरातील सर्व कार्यकर्त्यांना डब्बा घेऊन बोलवून एकत्रित जेवणाचा हा उपक्रम आहे. या उपक्रमासाठी रावसाहेब दानवे हे सुद्धा स्वतःचा डब्बा घरून घेऊन येतात आणि जेवणासोबत कार्यकर्त्यांशी गप्पांचा फड रंगतो. हा एक आगळा वेगळा उपक्रम आहे. प्रत्येकजण वाटून खातात. कार्यकर्त्यांमध्ये प्रेम वाढतं, स्नेह वाढतो. गावात चर्चा होते. बारा वर्ष हातानं स्वयंपाक केला. यात बेसन भाकर हा आपला आवडता पदार्थ असल्याचं दानवे यावेळी म्हणाले. आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं कार्यकर्त्यांना एकत्र करून मार्गदर्शन करणं, हा यामागचा उद्देश असल्याचे रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचंही ते म्हणाले.