अंधाराचा फायदा घेत डेपोतून बस पळवली, वेडसर मुलामुळे हजारोंचं नुकसान
एका वेडसर किंवा दारुड्या व्यक्तीने बस पळवल्याची घटना समोर आली आहे. (Unknown Person Ran Away With Bus In Latur)
लातूर : अंधाराचा फायदा घेऊन एका वेडसर किंवा दारुड्या व्यक्तीने बस पळवल्याची घटना समोर आली आहे. लातुरातील निलंगा तालुक्यातल्या औराद-शहाजनी या ठिकाणी ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Unknown Person Ran Away With Bus In Latur)
मिळालेल्या माहितीनुसार लातुरातील निलंगा तालुक्यातल्या औराद-शहाजनी या ठिकाण बस डेपो आहे. या ठिकाणी उभी असणाऱ्या बसेसपैकी एक बस रात्री 2.30 च्या सुमारास एका वेडसर किंवा दारुड्या व्यक्तीने पळवली. अंधाराचा फायदा घेत ही बस पळवली असल्याचे बोललं जात आहे. याप्रकरणी निलंगा आगार प्रमुखांनी पोलिसात तक्रार केली.
यानंतर पहाटे 3 वाजता ही एसटी बस शेळगी रस्त्यावर आढळली. यानंतर ही बस चालक-वाहकाच्या स्वाधीन करण्याता ली. या एसटी बसचे 25 हजाराचे नुकसान झाले. एखाद्या वेडसर किंवा दारुड्याने ही बस पळवल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी निलंगा आगार प्रमुखांनी पोलिसात तक्रार केली आहे. सध्या पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहे.(Unknown Person Ran Away With Bus In Latur)
शानदार ऑफर! अवघ्या 7999 रुपयांमध्ये खरेदी करा Thomson स्मार्ट TV#Thomson #ThomsonTVhttps://t.co/wFGq6tKz8N
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 4, 2021
संबंधित बातम्या :
कार्यक्रमासाठी कोल्हापुरात, जेवणामध्ये गुंगीचं औषध घालून कलाकारांची लूट
पंढरपुरात चोरीला गेलेले मोबाईल कर्नाटकात ट्रेस, अल्पवयीन चोरट्याकडे घबाड सापड