राज्यात धुळवडीतच पावसाची धुळधाण, विदर्भ-मराठवाड्याला पावसानं झोडपलं,वाचा कुठे काय स्थिती?

काल संध्याकाळपासूनच औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, ठाणे, रायगड आदी भागात पावसाची रिपरिप सुरु झाली. तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.

राज्यात धुळवडीतच पावसाची धुळधाण, विदर्भ-मराठवाड्याला पावसानं झोडपलं,वाचा कुठे काय स्थिती?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 9:01 AM

मुंबई : ऐन होळी (Holi) आणि धुळवडीतच (Dhulwad) राज्यातील विविध भागांना अवकाळी पावसानं झोडपलंय. त्यामुळे नागरिकांच्या उत्साहावर विरजण पडलंय. तर हाता-तोंडाशी आलेली पिकं डोळ्यादेखत नष्ट होताना पाहून शेतकऱ्यावर आभाळ कोसळल्याची स्थिती आहे. 5 ते 8 मार्च दरम्यान राज्यात विदर्भ मराठवाड्यासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार काल संध्याकाळपासूनच औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, ठाणे, रायगड आदी भागात पावसाची रिपरिप सुरु झाली. तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी वीज पडून जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

अहमदनगरात पावसाचा तडाखा

ढगांचा गडगडाट, विजांच्या लखलखाटात अहमदनगर जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा तडाखा बसला. कांद्याचे भाव कोसळलेले असतानाच, अवकाळी पावसाच्या तडाख्याने गहू आणि हरभरा पिकं धोक्यात आली आहेत. या आस्मानी संकटामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक कंबरडच मोडलय. काही भागात वादळी वा-यासह पाऊस झाल्याने रस्त्यावर झाडाच्या फांद्या तूटून पडल्या आहेत. तर जिल्हयातील अनेक भागात काल सायंकाळपासूनच वीजपुरवठादेखील खंडीत झाला आहे.

माळशेज घाटात तुफ्फान बॅटिंग

कल्याण नगर महामार्गावर माळशेज घाटात मंदिराजवळ आवकाळी पाऊसाची तुफान बँटिंग झाली. यामुळे सर्वत्र पाणीच पाणीच झाल्याचे पहायला मिळाले. दिवसभर कडाक्याच्या उन्हाने अंगाची लाही लाही होत असताना अचानक वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. मात्र माळशेज घाटात आवकाळी पाऊसाने तुफान बँटींग केली. यावेळी घाटमाथ्यावरुन पाऊसाचे पाणी थेट घाटात आल्याने काही काळ माळशेज मार्गावर वाहतूक थांबविण्यात आली. पावसामुळे माळशेज घाटाच्या रस्त्यावर पुन्हा एकदा खड्डे पाडण्यास सुरुवात होईल अशी स्थिती निर्माण झालीय.

संभाजीनगरात जोरदार पाऊस

छत्रपती संभाजीनगर शहर व परिसरात काल संध्याकाळपासून पावसानं हजेरी लावली आहे. शहर व परिसरात सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाच्या सरींपासून बचाव करतच काल अनेक ठिकाणी होळीचे दहन करण्यात आले.

बुलढाणा आणि अकोल्यातही मुसळधार

अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात सतत दुसऱ्या दिवशी सुद्धा रात्री जवळपास सर्वच तालुक्यात विजांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला … या अवकाळी पावसामुळे मात्र , गहू हरभरा , कांदा पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शेतकरी पुन्हा एकदा चिंतातूर झालेला आहे. सध्या शेतकऱ्यांचा गहू, हरभरा काढणीला आलाय, मात्र या अवकाळी पावसाने मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे ..

नांदेडमध्ये भाजीपाला भिजला, हवेत गारठा

नांदेड जिल्ह्याच्या काही भागात मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे नांदेडमध्ये भाजीपाला विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांचा भाजीपाला भिजून नुकसान झालंय. तर काढणीला आलेल्या ज्वारी आणि गव्हाच्या पिकाचे या पावसामुळे नुकसान होणार आहे. दरम्यान या पावसानंतर नांदेडमध्ये वातावरणात पुन्हा गारठा वाढलाय.

वाशिम-कारंज्यात वादळी पाऊस

वाशीम जिल्ह्यात रात्री कारंजा तालुक्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बीतील काढणीला आलेल्या गहू,हरभरा,पिकासह भाजीपाला पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.