Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangli : ह्रदय पिळवटून टाकणारं चित्रं, वीज कोसळल्याने मेंढपाळासह 10 मेंढ्यांचा मृत्यू

निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट इथपर्यंत ठीक होते. पण आता हे नैसर्गिक संकट जीवावर बेतत आहे. भर उन्हाळ्यात पावसाळ्याची अनुभती येत असून जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे शिवारात ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील जत रस्त्यावर मेंढ्याच्या कळपावरच वीज कोसळली असून यामध्ये मेंढपाळासह 10 मेंढ्याचा मृत्यू झाला आहे.

Sangli : ह्रदय पिळवटून टाकणारं चित्रं, वीज कोसळल्याने मेंढपाळासह 10 मेंढ्यांचा मृत्यू
सांगली जिल्ह्यामध्ये मेंढ्याच्या कळपावरच वीज कोसळली असून यामध्ये मेंढपाळासह 10 मेंढ्याचा मृत्यू झाला.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 10:11 AM

सांगली : (The vagaries of nature) निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट इथपर्यंत ठीक होते. पण आता हे नैसर्गिक संकट जीवावर बेतत आहे. भर उन्हाळ्यात पावसाळ्याची अनुभती येत असून (Sangli) जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे शिवारात ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील जत रस्त्यावर मेंढ्याच्या कळपावरच वीज कोसळली असून यामध्ये (Shepherd) मेंढपाळासह 10 मेंढ्याचा मृत्यू झाला आहे. दिवसभर मेंढ्या चारल्यानंतर घराकडे परतत असतानाच हा प्रकार घडला. यामध्ये रामचंद्र पांडूरंग गडदे हे गंभीररित्या जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर घटनास्थळी 10 मेंढ्या ह्या मृत अवस्थेत होत्या. हातावर पोट असणारे मेंढपाळ चाऱ्यासाठी भटकंती करतात. मात्र, या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

घराकडे निघतानाच काळाचा घाला

रामचंद्र गडदे हे नेहमीप्रमाणे आपल्या मेंढ्या चारावयास घेऊन गेले होते. नांगोळे गावातील जत रोडच्या भागातच ते मेंढ्या चारत असत. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल आणि विजांचा कडकडाट होत असल्याने ते लवकरच घरी परतत होते. गुरुवारी मेंढ्या चारुन घराकडे परतत असतानाच कवठेमहांकाळ जत रस्त्यावर पिंपळवाडी बस थांब्याच्या पुढे लोखंडी पुलाच्या जवळ नांगोळे गावच्या हद्दीत आले असता वादळी वारे व पाऊस जोरदार सुरू झाला होता.याच वेळी जोरदार विजांचा कडकडाट होऊन रामचंद्र गडदे यांच्या अंगावर व मेंढ्याच्या कळपावर विज कोसळली त्यात ते गंभीर भाजले त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.

रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

घटनेची माहिती मिळताच रामचंद्र गडदे यांच्या भाच्याने घटनास्थळी धाव घेतली. मामाला जखमी अवस्थेत पाहून सुनिल हुबाले यांनी कवठेमहांकाळ येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

जीवावर बेततेय अवकाळी

गेल्या वर्षभरापासून वातावरणातील बदल हा काही नवीन नाही. पण हाच बदल आता शेतकऱ्यांच्या जीवावर बेतत आहे. अवकाळी पावसामुळे खरिपासह रब्बी हंगामातील पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण आता पशूधनाचे झालेले नुकसान कसे भरुन काढावे हा प्रश्न आहे. या घटनेमध्ये घरचा कर्ता पुरुष तर गेलाच शिवाय 10 मेंढ्याचाही मृत्यू झाला आहे. यामध्ये त्यांचे 2 लाखाचे नुकसान झाले आहे. 10 मेंढ्याचा मृतदेह शिवारात तर गडदे यांचा रुग्णालयात असे चित्र होते.

इतर बातम्या :

Accident | परळहून सुटलेली खासगी बस रत्नागिरीत उलटली, चालकाची डुलकी 25 प्रवाशांना महागात

Aurangabad | मैत्रीणीच्या नावाने इंस्टा अकाउंट, मित्र-मैत्रीणींशी चॅटिंग, औरंगाबाद पोलिसांनी उघडा पाडला बनाव!

Aurangabad VIDEO | ओट्यावर बसून घराकडे का पाहतोस? टोळक्याची मारहाण, औरंगाबादेत तरुणाचा मृत्यू

हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.