आदिवासी भागात ‘पुष्पा’ भाऊची गॅंग सक्रिय, चंदनाच्या लाकडांची नाहीतर ‘या’ लाकडांची होतेय तस्करी

दुर्मिळ झाडांपैकी एक असलेल्या खैराशी झाडाची तस्करी होण्याचे प्रमाण आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात आहे. जंगल परीसरात खैराशीचे झाडे निदर्शनास येतात.

आदिवासी भागात 'पुष्पा' भाऊची गॅंग सक्रिय, चंदनाच्या लाकडांची नाहीतर 'या' लाकडांची होतेय तस्करी
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 9:54 AM

नाशिक : गेल्या काही महिन्यांपूर्वी पुष्पा चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी त्या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. त्या चित्रपटातील चंदन तस्करी चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, यामध्ये तस्करी करणाऱ्यां पुष्पाला पोलिस रोखण्याचा प्रयत्न करत होती. अशीच काहीशी तस्करी नाशिकच्या आदिवासी भागात होत आहे. परंतु तिथे वनविभाग किंवा पोलिसांचं दुर्लक्ष आहे. आणि विशेष म्हणजे येथे चंदनाची तस्करी होत नाही. गुटखा बनविण्यासाठी ज्या झाडाचा पवार होतो त्या खैराशी नावाच्या झाडांची तस्करी होत आहे. खैराशीची झाडं ही जंगल परिसरात असतात. त्याच्या लाकडापासून गुटखा बनविला जातो. अनेक कंपन्यांना खैराशी झाडाची लाकडं लागतात. ती झाडं हळूहळू दुर्मिळ होत चालली असली तरी नाशिकच्या आदिवासी भागातील जंगल परिसरात खैराशी झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रात्रीच्या वेळी स्थानिक नागरिकांना हाताशी धरून काही तस्कर खैराशी झाडांची तस्करी करत आहे. जंगल परिसरात खैराशी झाडांची सर्रासपणे कत्तल होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

दुर्मिळ झाडांपैकी एक असलेल्या खैराशी झाडाची तस्करी होण्याचे प्रमाण आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात आहे. जंगल परीसरात खैराशीचे झाडे निदर्शनास येतात.

गुटखा बनविणाऱ्या कंपन्यांमध्ये खैराशी झाडांचा वापर केला जातो. खैराशीचे झाड हे गुटखा करतांना महत्वाचा भाग असतो, त्यामुळे खैराशीचे झाडांची तस्करी जंगल परिसरातून करण्यासाठी एक गॅंग सक्रिय आहे.

महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असणाऱ्या खैराशी झाडांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे, यावर कुणाचाही अंकुश नसल्याचे गावकरी सांगतात, गुटखा बनविण्यासाठी लागणारे खैर हे खैराच्या झाडपासून काढले जाते.

आदिवासी भागात असलेल्या या खैराशीच्या झाडांना रात्रीच्या वेळी तोडून स्थानिक नागरिकांना कवडीमोल पैसे देऊन तस्कर हे खैराचे लाकूड कंपन्यांना विक्री करत आहे.

चंदन झाडांची होणारी तोड जशी बेकायदेशीर आहे अगदी तशीच दुर्मिळ असलेल्या खैराच्या झाडाची तोडही बेकायदेशीर आहे, ही तस्करी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या खरोखर निदर्शनास येत नाही का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

किलोला चाळीस रुपये पर्यन्त भाव मिळत असल्याने लाखों रुपये उत्पन्न काही दिवसांत मिळत असल्याने तस्करीचे प्रमाण वाढले असून हे रोखण्यासाठी वनविभाग आणि पोलीसांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.