Atal Setu | देशाच्या सर्वात मोठ्या मुंबई अटल सागरी सेतूसाठी या 7 टेक्नॉलॉजीचा वापर

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सागरी सेतू देशातील सर्वात मोठा सागरी सेतू ठरला आहे. वांद्रे-वरळी सागरी सेतू पेक्षा मोठा असलेला हा मार्ग केवळ पाच वर्षात बांधून पूर्ण झाला आहे. या मार्गाला इंजिनिअरिंग मार्व्हल म्हटले जात आहे. काय आहेत त्याची सात इंजिनिअरिंग वैशिष्ट्ये पाहा..

Atal Setu | देशाच्या सर्वात मोठ्या मुंबई अटल सागरी सेतूसाठी या 7 टेक्नॉलॉजीचा वापर
MTHL ATAL SAGARI SETUImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jan 12, 2024 | 7:00 PM

मुंबई | 12 जानेवारी 2024 : देशाचा सर्वात मोठा शिवडी-न्हावाशेवा अटल सागरी सेतू इंजिनिरिंगचा चमत्कार ठरला आहे. या सागरी सेतूमुळे दक्षिण मुंबई ते नवीमुंबई हे अंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटांत कापता येणार आहे. या सागरी सेतूचे बांधकाम अवघ्या पाच वर्षांत पूर्ण करण्यात आले आहे. 21,200 कोटी खर्च करून तयार करण्यात आलेल्या 21.8 किमी लांबीच्या या उड्डाण मार्गाचा 16.5 किमी मार्ग समुद्राच्या पाण्यावरून जाणार आहे. या मार्गाला इंजिनिअरिंग मार्व्हल म्हटले जात आहे. या मार्गाची सात खास वैशिष्ट्ये जाणून घेऊया…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील सर्वात मोठ्या सागरी मार्ग शिवडी न्हावाशेवा महामार्गाचे लोकार्पण शुक्रवारी करण्यात आले आहे. या महामार्गामुळे नवीमुंबई बेटाला मुंबई बेट जोडले जाणार आहे. या मार्गाला शिवडी ते वरळी सागरी सेतूला जोडण्याचे देखील काम सुरु आहे. अटल सागरी सेतू ( मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ) संपूर्ण समुद्रात उभारण्यात आला असला तरी सागरी जीवनास त्यापासून कोणताही धोका पोहचू नये याची खास काळजी घेण्यात आली आहे.

भूकंपाही काही होणार नाही …

अटल सागरी सेतूला बांधण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. हा ब्रिज भूकंपातही तग धरुन रहाणार आहे. मरिन लाईफ प्रोटेक्शनसाठी खास काळजी घेण्यात आली आहे. चला तर या आधुनिक महामार्गाची वैशिष्ट्ये पाहूयात..

1)  भूकंप रोधक डीझाईन : या ब्रिज संपूर्णपणे भूकंपरोधक बांधकामा अंतर्गत तयार करण्यात आला आहे. विविध प्रकाराच्या भूकंपाच्या धक्क्यांना तो सहन करु शकतो. अगदी 6.5 रिश्टर स्केलचा भूकंपाच्या धक्क्यातही या ब्रिजला धोका पोहचणार नसल्याचे म्हटले जाते.

2) ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक : या ब्रिजसाठी देशात प्रथमच ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकचा वापर केला आहे. यामुळे या पुलाला विस्तृत स्पॅन मिळाल्याने त्याची संरचनात्मक बळकटी वाढली आहे.

3) रिव्हर्स सर्कुलेशन रिग्स : ध्वनी आणि कंपन कमी करण्यासाठी रिव्हर्स सर्कुलेशन रिग्स तंत्रज्ञान वापरले आहे. त्यामुळे या परिसरातीस सागरी जीवांचे रक्षण होणार आहे.

4) ध्वनी प्रदूषणापासून बचाव : ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी या ब्रिजला नॉईज सायलेन्सर आणि साऊंड बॅरिअर लावले असल्याने पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होणार आहे.

5) इको फ्रेंडली लायटींग : या पुलावरील प्रकाश व्यवस्था सागरी पर्यावरणाला अनुकुल अशी ठेवण्यात आली आहे.

6) टोलच्या रांगा नाहीत : MTHL वर ओपन रोड टोलींग प्रणाली असणार आहे. त्यामुळे टोलनाक्यांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगांपासून सुटका होणार आहे. प्रगत स्कॅनर वाहनांना स्कॅन करुन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल वसूल करणार आहेत. वाट पाहावी लागणार नाही.

7) डिस्प्ले : या पुलावर चालकांना रिअल-टाइम माहिती देण्यासाठी ठराविक अंतराने डिस्प्ले देखील लावलेले असतील. त्यामुळे मार्गावरील वाहतूक कोंडी किंवा अपघातांबद्दल सूचना या डिस्प्लेवर मिळणार आहेत.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.