बायका जश्या बोटं मोडून शाप देतात तसा त्यांनी शाप दिला… देवेंद्र फडणवीस यांच्यावर बड्या नेत्याचा हल्ला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 वर्षात काय दिलं हे सांगणे अपेक्षित होतं. मात्र त्यांनी शिव्या शाप देणे, तसेच परमेश्वर त्यांचा सत्यानाश करील असे वक्तव्य करणे अतिशय दुर्दैवी आहे. परंतु ही जनता येणाऱ्या 4 जूनला कोणाचा सत्यानाश करते हे त्यांना समजेल, असा जोरदार हल्ला धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी चढवला.
माझ्या पराभवाची एक लाख आणि तुमच्या फसवणूकीची एक लाख अशी दोन लाख मतांच लीड मिळणार आहे. म्हणून आम्ही दोघांनी प्रायश्चित म्हणून हाच माढा साहेबाच्या पायाशी ठेवायचं वचन दिलं आहे, असं सांगतानाच बायका जश्या बोटं मोडून शाप देत असतात तसा मला त्यांनी शाप दिला, अशा शब्दात धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. एका प्रचार सभेत बोलताना त्यांनी ही टीका केली.
या 84 वर्षाच्या योद्ध्यासाठी सर्वांना अभिवादन करायला सांगितले. अवघ्या देशाचे लक्ष या माणसाकडे लागून आहे. ते आपल्या मोदी साहेबांचे गुरु आहेत. कारण मोदी साहेबांनी गुरुच्या नंतर सभा करायची नसते आणि म्हणून त्या अगोदरच या ठिकाणी सभा करून गेले आहेत. शरद पवार साहेब अजातशत्रू आहेत, असं उत्तम जानकर म्हणाले.
काठी आणि घोंगडं देण्याऐवजी…
फलटणच्या सभेत शरद पवार यांनी काठी आणि घोंगडं नाकारल्याचं सांगितलं जात आहे. त्यात काही तथ्य नाही. काही लोक जिल्ह्यात आले होते. त्यांनी काठी आणि घोंगडं हातात घेऊन तसेच पिवळा फेटा बांधून या जिल्ह्यात सभा घेतली. त्यांच्या हातात पुन्हा काठी देण्याऐवजी या काठीचा उपयोग त्यांची पाठ फोडण्यासाठी केला पाहिजे. माधवराव जानकर आमचे मित्रच आहेत. त्यांच्यावर टीका करणार नाही. आरक्षणाची फसवणूक करणारे या तालुक्यात येऊन गेले. त्यामुळे पुन्हा फसवणूक करून घेऊ नका. बायका जश्या बोटं मोडून शाप देत असतात, तसा त्यांनी मला शाप दिला, अशी टीका उत्तम जानकर यांनी फडणवीस यांच्यावर केली.
तेव्हा काय करत होता?
यापूर्वीह उत्तम जानकर यांनी भाजपवर टीका केली होती. दोन दिवसांपूर्वी तर त्यांनी भाजपर घणाघाती हल्लाच चढवला होता. मोदींनी मराठा आणि धनगर आरक्षणावर बोलायला हवं होतं. तसेच पंतप्रधान म्हणून काय काम केलं हे सांगणे अपेक्षित होतं. गेली दहा वर्ष झाले तुम्ही सरकार चालवत आहात. सरकार जाण्याची वेळ आली आहे. त्यावेळेस तुम्हाला या तालुक्यातील गुंडगिरी दिसते, दहशतवाद दिसतोय. मग गेली दहा वर्षे तुमच्याकडे गृह खाते होते, तुम्ही त्यावेळेस नक्की काय करत होता? हा प्रश्न जनतेला पडला आहे, असंही ते म्हणाले.