‘टायगर’ पाहिला का? अहो मुख्यमंत्र्यांचा बॉडीगार्ड, सात फूट उंची, पिळदार शरीरयष्टी

आपल्याला रेसलिंगमधला द ग्रेट खली माहिती आहे. खली त्याच्या कर्तृत्वामुळे जगभरात पोहोचला आहे. उत्तर प्रदेश सरकारने खली सारखाच एक बॉडीगार्ड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेसाठी अयोध्येत तैनात केला आहे.

'टायगर' पाहिला का? अहो मुख्यमंत्र्यांचा बॉडीगार्ड, सात फूट उंची, पिळदार शरीरयष्टी
Follow us
| Updated on: Apr 08, 2023 | 8:41 PM

लखनौ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे अयोध्या (Ayodhya) दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लखनौमध्ये दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून जोरदार तयारी करण्यात आली. त्यांचं उत्तर प्रदेश सरकारकडून अतिशय उत्साह आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं. एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी यूपी सरकारकडून एक विशेष बँड पथक लखनौ विमानतळावर तैनात करण्यात आलेलं. या पथकाने अतिशय वाजतगाजत मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. शिंदेंच्या स्वागतासाठी उत्तर प्रदेश सरकारचे जलसंपदा मंत्री स्वतंत्रदेव सिंह हे विमानतळावर दाखल झालेले. याशिवाय भाजप प्रभारी तिथे हजर होते. अतिशय भारावून टाकेल, अशा स्वरुपात एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार-खासदारांचं यावेळी स्वागत करण्यात आलं.

उत्तर प्रदेश सरकारने एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी केली आहे. अगदी मुख्यमंत्र्यांना सुरक्षा पुरविण्यापासून ते त्यांच्या प्रत्येक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी उत्तर प्रदेश सरकारकडून घेतली जात आहे. अयोध्येत आज सकाळपासून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे अयोध्येला छावणीचं स्वरुप आलंय की काय, असं चित्र आहे. मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा सगळा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. उत्तर प्रदेश सरकारने एकनाथ शिंदे यांच्यासाठी बुलेटप्रूफ कारची व्यवस्था केलीय. तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी एका विशेष सुरक्षा रक्षकाची व्यवस्था उत्तर प्रदेश सरकारकडून करण्यात आली आहे.

तो सुरक्षा रक्षक नेमका कोण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेसाठी अयोध्येत एक विशेष सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला आहे. सोनू टायगर असं या सुरक्षा रक्षकाचं नाव आहे. कल्याणचे शहरप्रमुख महेश गायकवाड हे सोनू टायगर याच्यासोबत अयोध्येत आहेत. सोनू टायगर याची उंची 7 फूट 2 इंच आणि दीडशे किलो त्याचं वजन असल्याची माहिती महेश गायकवाड यांनी दिली. सोनूकडे अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत. तो उद्या दिवसभर एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेसाठी अयोध्येत तैनात असणार आहे. सोनूने ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित केली. यावेळी त्याने आपली उंची नेमकी कितीय याबाबत माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, अयोध्येमध्ये घडामोडी घडत असताना भाजपच्या गोटातही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांनी भाजप नेत्यांना देखील अयोध्या दौऱ्याचं निमंत्रण दिलं आहे. त्यांचं हे निमंत्रण राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वीकारलं आहे. त्यामुळे ते सोलापूरहून लखनौच्या दिशेला रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे ते सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत लखनऊवरून अयोध्येत जाणार आहेत. तसेच राधाकृष्ण विखे पाटील हे श्रीराम मंदिर येथील महाआरतीत देखील मुख्यमंत्र्यांच्या सोबत उद्या सहभागी होणार आहेत. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अयोध्या दौऱ्याला जाण्याची शक्यता आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.