vaccine for child : सीरम इन्स्टिट्यूटनं लहान मुलांसाठी तयार केलेल्या कोरोना लसीला‘WHO’कडून मंजुरी, या वयोगटातील मुलांना मिळणार लस
सीरम इन्स्टिट्यूटनं लहान मुलांसाठी तयार केलेल्या कोरोना लसीला (Covovax) ‘WHO’कडून मंजुरी मिळाली आहे. १२ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांना लवकरच लस मिळू शकणार आहे.
जगभरात ओमिक्रॉनचा फैलाव आणि भीती पसरली असतानाच भारतीयांसाठी आणि जगासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कारण सीरम इन्स्टिट्यूटनं लहान मुलांसाठी तयार केलेल्या कोरोना लसीला (Covovax) ‘WHO’कडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे 12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांना लवकरच लस मिळू शकणार आहे. त्यामुळे लहान मुलांना आता लवकरच लसीकरण करण्यास सुरूवात केली जाऊ शकते. महाराष्ट्र राज्य देशात लसीकरणात आघाडीवर आहे.
12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांना लवकरच लस
सीरमच्या आदर पुनावाला यांनी ट्विटर करून लहान मुलांसाठी तयार केलेल्या कोरोना लसीला (Covovax) ‘WHO’कडून मंजुरी मिळाल्याची माहिती दिली आहे. राज्यात ओमिक्रॉनचा फैलाव वाढत होता, अशात राज्य सरकारकडून लसीकरणाची वयोमर्यादा कमी करण्याचा विचार सुरू होता, मात्र आता ती वेळ टळणार आहे. लहान मुलांसाठी वेगळी लस तयार आहे. त्यांना 18 वर्षे वयोगटावरील लस देऊन जोखीम पत्करण्याची आता गरज उरली नाही, सीरमने 12 ते 17 वयोगटातील मुलांसाठी वेगळी Covovax ही लस तयार केली आहे. त्यामुळे आता लवकरच लहान मुलांचे लसीकरण करण्यास सुरूवात केली जाऊ शकते.
This is yet another milestone in our fight against COVID-19, Covovax is now W.H.O. approved for emergency use, showing excellent safety and efficacy. Thank you all for a great collaboration, @Novavax @WHO @GaviSeth @Gavi @gatesfoundation https://t.co/7C8RVZa3Y4
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) December 17, 2021
केंद्र आणि राज्याच्या परवानगीची गरज
या लसीला Who ची परवानगी मिळण्याची गरज होती, ती मिळाल्यानंतर आदर पुनावाला यांनी त्यांचे आभारही मानले आहेत. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या परवानगीसाठी पाठवण्यात येईल आणि त्यानंतर लहान मुलांच्या लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्याता आहे. युरोपतही मुलांचे लसीकरण 15 डिसेंबरपासून सुरू केले आहे. ओमिक्रॉनच्या धास्तीने खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात मात्र अजून प्रतीक्षा होती. ती आता संपली आहे.