नितेश राणेंच्या जन्माअगोदर शिवसेनेचं हिंदुत्व, त्यांची बोलण्याची कुवत नाही : वैभव नाईक

भाजप नेते नितेश राणे यांच्या जन्माच्या अगोदरपासून शिवसेनेचे हिंदुत्व आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेच्या हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांची तेवढी कुवतदेखील नाही, असा घणाघाती शाब्दिक हल्ला शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी भाजप नेते नितेश राणे यांच्यावर केला.

नितेश राणेंच्या जन्माअगोदर शिवसेनेचं हिंदुत्व, त्यांची बोलण्याची कुवत नाही : वैभव नाईक
NITESH RANE VAIBHAV NAIK
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 12:01 PM

सिंधुदुर्ग : भाजप नेते नितेश राणे यांच्या जन्माच्या अगोदरपासून शिवसेनेचे हिंदुत्व आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेच्या हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांची तेवढी कुवतदेखील नाही, असा शाब्दिक हल्ला शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी भाजप नेते नितेश राणे यांच्यावर केला. ते सिंधुदूर्गमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरदेखील भाष्य केलं.

राणेंच्या जन्माच्या आधीपासून शिवसेनेचे हिंदुत्व

राणे आणि ठाकरे कुटुंबीयांमधील राजकीय वैर सर्वश्रूत आहेत. राणे कुटुंबीयांकडून ठाकरे सरकार तसेच महाविकास आघाडीला नेहमीच लक्ष्य केलं जातं. आर्यन खान ड्रग्ज प्रकरण तसेच समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पाठीमागे उभं न राहता शिवसेना अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला पाठिंबा देते आहे, असा आरोप राणे यांनी केला होता. राणे यांच्या याच आरोपांना वैभव नाईक यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “नितेश राणेंच्या जन्माच्या आधीपासून शिवसेनेचे हिंदुत्व आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेच्या हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांची तेवढी कुवतदेखील नाही. शिवसेनेने गेली 60 वर्षे हिंदुत्व जपलेलं आहे. आणि यापुढच्या काळातदेखील शिवसेना हिंदुत्व जपेल, असं रोखठोक प्रत्युत्तर नाईक यांनी राणे यांना दिलं.

नवाब मलिक पाकिस्तानचे एजंट आहेत

आर्यन खानला अटक प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या समीर वानखेडे यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवरदेखील नितेश राणे यांनी बोट ठेवले आहे. त्यांनी समीर वानखेडे यांना पाठिंबा दिलाय. मलिक हे पाकिस्तानचे एजंट आहेत. पाकिस्तानचे जे ड्रग्ज माफिया आहेत. नवाब मलिक त्यांचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत. जावयाला अटक केली म्हणून ते एनसीबीवर टीका करत आहेत. काम करणाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होत आहे; हे त्यांना कळत नाही, अशी टीका नितेश राणे यांनी 23 ऑक्टोबर रोजी केली होती.

आर्यन खानला जामीन मंजूर

दरम्यान, क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खानला शेवटी जामीन मंजूर करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. एनसीबी आणि आर्यन खान यांची बाजू ऐकूण घेतल्यानंतर कोर्टाने हा निकाल दिला आहे. कोर्टाने आदेशपत्र जारी जारी केलेलं नाही. मात्र आर्यन तसेच अरबाज मर्चंट, मूनमून धमेचा यांनांदेखील जामीन मंजूर करण्यात आलाय.

इतर बातम्या :

वानखेडेंविरोधातील बदनामीसत्र चीड आणणारं, अंजली दमानिया यांचा समीर वानखेडे यांना पाठिंबा

Gold Silver Rate Today : सोने पुन्हा एकदा महागले, चांदीचा भाव घसरला; पटापट तपासा ताजे दर

Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला 25 दिवसांनी जामीन, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?

(vaibhav naik criticizes nitesh rane for sameer wankhede and aryan khan drugs case)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.